अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी नक्षलवाद्यांना नकाशे, माहिती पुरवली ; पुणे पोलिसांचा धक्कादायक खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – माओवाद्यांशी संबंध असल्यावरून सध्या पुणे पोलिसांच्या अटकेत असलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी गडचिरोली आणि बस्तरमध्ये असलेल्या माओवाद्यांना नकाशे आणि पोलिसांच्या हालचालींची माहिती पुरवली असल्याचा धक्कादायक खुलासा जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात केला आहे. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याची फॉरेन्सिक तपासणी केल्यानंतर त्यात ही माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले.

२०१६ पासून झालेले नक्षलवादी हल्ले आणि ती ठिकाणं पोलिसांनी जप्त केलल्या नकाशांमध्ये आहेत. जप्त करण्यात आलेली पत्रे केवळ फक्त भूमीगत माओवाद्यांशी संबंधित नाहीत. तर ती अटक करण्यात आलेल्यांशी संबंधित आहेत. त्यांचा बेकायदेशीर हालचाली आणि नक्षली कारवायांमध्ये सहभाग असल्याचे या पत्रांवरून स्पष्ट होते. याप्रकरणी दाखल असलेल्या एफआरचा दाखला देत त्यांनी तत्कालीन माओवादी प्रल्हाद सिंह याच्या जबाबाचा दाखलाही दिला. यावरून त्यांचा माओवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याचे आणि दलित समाजामध्ये विद्रोही विचार पेरण्याचा प्रयत्न असल्याचा खुलासा त्यांनी न्यायालयात केला.

पुणे पोलिसांनी एल्गार परिषद आणि कथित माओवादी कनेक्शनप्रकरणी अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्यासह पाच जणांना अटक केली. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर नक्षलवाद पसरवण्याचा आरोप सुरेंद्र गडलिंग यांच्यावर आहे. तर त्यांनी नक्षलवादी कारवायांसाठी पैसे पुरविल्याचे पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. तर त्यांना अटक केली तेव्हा पुणे पोलिसांनी काही इलेक्ट्रॉनिक साहित्य, कागदपत्रे आणि पुस्तकं जप्त केली होती.

You might also like