गडचिरोली पोलिसांनी 14 माअोवाद्यांना घातले कंठस्नान

गडचिरोलीः पोलीसनामा आॅनलाईन

गडचिरोली पोलीसांनी 14 माअोवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भामरगड तालुक्यातील ताडगाव जंगलात ही कारवाई करण्यात आली. नक्षल विरोधी भागात प्रतिबंधक कारवाई करत असताना हे यश गडचिरोली पोलिसांना आले आहे. भामरगड तालुक्यातील ताडगावच्या जंगल परिसरात नक्षलवादी असल्याची गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना बातमीदारा मार्फत मिळाली होती. सदर माहितीची पडताळणी करुन केलेल्या कारवाईत 14 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. पेरिमिली दलम कमांडर साईनाथ सैन्यू हे मोठे नक्षल वादी नेते ठार. ”दहा पेक्षा अधिक माओवादी ठार झाल्याची माहिती,”पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिली.