नाकाबंदी दरम्यान कारच्या धडकेत पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – नाकाबंदीचे कर्तव्य बजावित असताना भरधाव कारने पोलिस कर्मचार्‍याला चिरडल्याची घटना गडचिरोली जिल्हयातील आरमोरी गावाजवळ रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. कारचालकाने मद्यप्राशन केले होते काय याबाबत आरमोरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

केवलराम येलुरे (40) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. येलुरे यांची डयुटी नाकाबंदीसाठी लावण्यात आली होती. भरधाव स्विफ्ट डिझायरने त्यांना जबर धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या येलुरे यांचा मृत्यु झाला आहे. नाकाबंदी दरम्यान पोलिस कर्मचारी येलुरे यांनी लाईट दाखवत कारचालकास थांबण्याचा इशारा दिला होता. मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत त्यांना डविले.

अपघातानंतर नाकाबंदी डयुटीवर हजर असलेल्या इतर पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतले आहे. कारमध्ये असणारे गडचिरोलीचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. येलुरे यांचे पार्थिव गणेशपूर येथे पाठविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची महिती देण्यात आली आहे.

Loading...
You might also like