महिलांच्या ‘मुक्तिपथ’ गटाची ‘धडाकेबाज’ कारवाई ; ७ हजार दारुच्या बाटल्या जप्त

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाईन – चंद्रपूर, गडचिरोली या तालुक्यात दारूबंदी असताना देखील राजरोसपणे दारूची विक्री केली जाते. प्रशासन देखील याकडे गांभीर्याने पाहत नाही. पोलिसांकडून देखील या दारूविक्रीला छुपा पाठींबा मिळतो. या दारूमुळे कित्येकांचे संसार उद्धवस्त होतात. याचा सर्वात जास्त फटका महिलांना बसतो. त्यामुळे आता ही दारू विक्री थांबवण्यासाठी महिलाच पुढे सरसावल्या आहेत. गडचिरोलीतील आदिवासी महिलांनी चोरून आणलेली ३५ पेक्षा जास्त पोती देशी दारू पकडून पोलिसांच्या हवाली केली आहे. या ३५ पोत्यांमध्ये ७ हजार दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दारूबंदी विरुद्ध आक्रमक भूमिका घेणाऱ्या ‘मुक्तिपथ’ या महिला गटाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे. गुत्तेदारांनी छत्तीसगढमधून ही दारु चोरुन आणली होती.

गडचिरोलीत अनेक वेळा शासनाने दारूबंदी करूनसुद्धा या ठिकाणची दारूबंदी काय थांबली नाही. अवैधरित्या दारूची विक्री कायम सुरुच असते. अशावेळी महिलांनीच पुढाकार घेऊन ‘मुक्तिपथ’ या गटाची स्थापना केली. या गटाला छत्तीसगडमधून चोरून दारूचा साठा आणला असल्याची माहिती मिळाली. हा दारुचा साठा जमिनीत पुरून ठेवण्यात आला होता. आदिवासी महिलांच्या एका गटाने जंगलात या दारुचा शोध घेतला.

देशी दारुची ३५ पोती जमिनीत पुरून ठेवलेली त्यांना आढळून आलं. त्यांनी ती सर्व पोती बाहेर काढली आणि ट्रकमध्ये भरून पोलिसांच्या हवाली केली. या ३५ पोत्यांमध्ये तब्बल ७ हजार बाटल्या होत्या. पोलीस आता गुत्तेदारांचा शोध घेत आहेत. महिलांच्या या कारवाईमुळे अवैध दारुची विक्री करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झालीये.

 

आरोग्यविषयक वृत्त –

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

Loading...
You might also like