BSNL प्रीपेड ग्राहकांसाठी ‘अभिनंदन १५१’ प्लान ; जाणून घ्या काय आहे प्लान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्या वेगवेगळे प्लान आणत असतात त्यामागे वाढत्या स्पर्धेला तोंड देऊन ग्राहकांना आकर्षित करणे हा उद्देश कंपनीचा असतो त्या धर्तीवर बीएसएनएलकडून जुन्या प्लानमध्ये बदल करत बीएसएनएलने आता ‘अभिनंदन-१५१’ नावाने नवा प्रीपेड प्लान लाँच केला आहे.

बीएसएनएल ने आणलेल्या ‘अभिनंदन १५१ या नव्या प्लानमध्ये दररोज १ जीबी इंटरनेट डेटा देण्यात येणार असून प्लानमध्ये १०० फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंग आहे. मुंबई आणि दिल्ली सर्कलमध्ये रोमिंग कॉलचा फायदा होणार आहे.

प्लानमध्ये मिळणारे फ्री बेनिफिट २४ दिवसांपर्यंत वैध असणार आहे. त्याशिवाय प्लानची वैधता १८० दिवस असणार आहे. बीएसएनएलचा हा प्लान ९० दिवसांसाठी बाजारात उपलब्ध असणार असून १० सप्टेंबरपर्यंत याची मुदत असणार आहे.

काही दिवसांपूर्वी रिलायन्स कंपनीने jio चा प्रयोग करत टेलिकॉम क्षेत्रात गोंधळ उडवून दिला होता आता या बीएसएनएलच्या प्लानमुळे ग्राहकांना आकर्षित करण्यात कितपत यश येतंय हे आगमी काळात कळेल.

आरोग्य विषयक वृत्त – 

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

‘Sponk’ आहे गुडघ्याचा दुर्मिळ आजार, वेळीच निदान होणे गरजेचे