आता गर्दीत कोरोना रुग्ण असल्यास वाजणार कोविड अलार्म, UK च्या संशोधकांनी लावला शोध

लंडन : वृत्तसंस्था – गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने (covid19) थैमान घातले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपल्याला आणखी काही काळ कोरोनासोबतच (covid19) राहावे लागणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा लवकर शोध लावण्यासाठी विविध प्रकारचे संशोधन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर यूकेतील संशोधकांनी (Researchers in the UK) एका इलेक्टॉनिक उपकरणाचा शोध लावला आहे. ज्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी केवळ शरीराच्या वासाच्या मदतीने कोरोना रुग्णाची ओळख पटणार आहे. यालाच संशोधकांनी कोविड अलार्म (Covid alarm) असे नाव दिले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

SBI Alert Message | सावधान ! ऑनलाईन व्यवहार करताय ? तर मग करू नका ‘ही’ चूक, अन्यथा..

युकेतील लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (LSHTM) अन् दुर्हम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या अभ्यासात म्हटले आहे की,
कोरोनाबाधित रुग्णांच्या शरीरातून विशिष्ट प्रकारचा वास (smell) येत असतो.
वोलाटाईल ऑर्गेनिक कम्पाऊंडमुळे (volatile organic compounds) असे होत असते.
यामुळे शरीराला एका विशिष्ट प्रकारचा वास येतो अन् सेन्सरच्या माध्यमातून तो डिटेक्ट केला जाऊ जातो.
या प्रयोगासाठी ऑर्गेनिक सेमी-कंडक्टिंग (organic semi-conducting) सेन्सर वापरले होते.
या प्रयोगाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.
त्यामुळे क्लासरुम, विमानतळ किंवा ऑफिसमध्ये हे उपकरण ठेवले जाऊ शकते.
जेव्हा सेन्सरने विशिष्ट प्रकारचा वास डिटेक्ट करेल त्यावेळी अलार्म वाजणार आहे.
हे उपकरण केवळ विषाणूचे अस्तित्व ओळखते, पण नेमकं कोणाला संसर्ग झाला हे ओळखत नाही.
त्यामुळे अशाप्रकारचा अलार्म वाजल्यास त्या ठिकाणच्या सर्व लोकांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. तेंव्हाच कोणाला कोरोनाची बाधा झाली हे समजणार आहे.

Web Title : gadgets could able to sniff out people infected with covid19 in crowded spaces Discovery by UK researchers

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

आता ‘पाकिस्तान क्रिकेट लीग’वरही ‘सट्टा’; सट्टेबाजी करणार्‍या 4 जणांना पोलिसांनी केली अटक

Salary Overdraft | नोकरदारांना खुशखबर ! तातडीची गरज भागवण्यासाठी खासगी आणि सरकारी बँका देत आहेत ‘ही’ सूविधा, जाणून घ्या