पंतप्रधान पदा बद्दल नितीन गडकरी यांनी केले मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे २२० जागा जिंकल्यास नितीन गडकरीच पंतप्रधान होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आली आहे. मात्र यात काहीच तथ्य नाही असे स्वतः नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. निवडणुकीनंतर मी पंतप्रधान होईल हि निव्वळ अफवा आहे असे नितीन गडकरी यांनी म्हणले आहेत. एका कार्यक्रमात त्यांनी पंतप्रधान पदाबाबत आपले मत स्पष्ट केले आहे.

२०१४ च्या निवडणुकीप्रमाणे तुम्ही अपेक्षित जागा जिंकल्या नाहीत तर २०१९ च्या निवडणुकीनंतर नितीन गडकरी सर्वसमावेशक चेहरा म्हणून समोर आणले जाऊ शकतात या आशयाचा प्रश्न गडकरी यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी म्हणले कि, मी पंतप्रधान होणार हि अफवा आहे. तसेच निवडणुकीनंतर भाजप सरकार केंद्रात प्रस्तापित होईल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे असून तुम्ही मित्र पक्षांच्या जवळचे असणारे नेते आहेत. त्यामुळे तुम्ही पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असू शकता असा प्रश्न विचारताच गडकरी म्हणले कि, ज्यांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या ज्यांना जे लिहायचे आहे ते लिहू द्या. मी पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. नरेंद्र मोदी यांनी विकास कामावर ज्या भूमिका घेतल्या आहेत. त्या भुमिकेमुळे भाजपला पुन्हा बहुमत मिळणार आहे असे नितीन गडकरी म्हणाले आहेत.