इंस्टाग्रामवर ‘हे’ राजकीय नेते सर्वाधिक लोकप्रिय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तारखा जाहिर झाल्यानंतर प्रत्येक पक्षातील उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेते मंडळींकडून सोशल मीडियाचा वापर केला जातो.

तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील पोस्टवर भर देण्यात येतो. फेसबुक आणि ट्विटर या दोन सोशल मीडियापाठोपाठ इंस्टाग्राम या सर्वाधीक लोकप्रिय आहे. सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रीय राहण्याच्या बाबतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा सर्वात अग्रेसर आहेत.

फॉलोअर्सच्या बाबतीत त्या दोघांमध्येच रस्सीखेच दिसून आली. रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या नावाने मात्र इंस्टावर तीन खाती सापडली असून त्यांच्या पोस्ट व फॉलोअर्सचे त्यामुळे विभाजन झाले आहे. मूळ चंद्रपूरचे असलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हेदेखील इंस्टावर फारसे ‘अ‍ॅक्टिव्ह’ दिसून आलेले नाहीत.

कुणाचे किती फॉलोअर्स
नागपूर
नितीन गडकरी : १.८३ लाख
नाना पटोले : १२९४
मोहम्मद जमाल : खाते नाही

रामटेक
कृपाल तुमाने : ७२२
किशोर गजभिये : १४३
सुरेश गजभिये : खाते नाही

भंडारा
नाना पंचबुद्धे : खाते नाही
सुनील मेंढे : ४०८
डॉ. विजया नंदूरकर : खाते नाही

गडचिरोली-चिमूर
डॉ. नामदेव उसेंडी : खाते नाही
अशोक नेते : ३७४
रमेश गजबे : खाते नाही

अमरावती
आनंदराव अडसूळ : २२८
नवनीत राणा : १.७१ लाख
गुणवंत देवपारे : खाते नाही

चंद्रपूर
हंसराज अहीर : १०९६
बाळू धानोरकर : २८७
अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे : खाते नाही

वर्धा
चारुलता टोकस : ४९८
रामदास तडस : १०६०
शैलेश अग्रवाल : खाते नाही

बुलडाणा
प्रतापराव जाधव : १२३
राजेंद्र शिंगणे : १४१
बळीराम सिरस्कार : खाते नाही

यवतमाळ-वाशीम
माणिकराव ठाकरे : १८३६
भावना गवळी : खाते नाही
प्रवीण पवार : खाते नाही

अकोला
संजय धोत्रे : खाते नाही
हिदायत पटेल : खाते नाही
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर : ३३२

मावळ
पार्थ पवार – ५२८६
श्रीरंग बारणे – ४४२६