Gail Recruitment-2021 | इंजिनिअर, MBA, वकील, BA पदवीधरांसाठी ‘गेल’मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gail Recruitment-2021 | गेलमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी दिलासा मिळाला आहे. देशाची महारत्न कंपन्यांपैकी एक गेल इंडिया लिमिटेडमध्ये (GAIL India) विविध विभागांमध्ये नोकर भरती निघाली आहे. गेल इंडिया कंपनीने एकूण 220 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये इंजिनिअर, वकील, मार्केटिंग, एचआर आदी पदे भरण्यात येणार आहे.

या पदांसाठी नोकर भरती

गेल इंडिया कंपनीने बुधवारी (दि.7) नोकर भरतीसंदर्भात नोटिफिकेशन (Notification) काढण्यात आले आहे. यानुसार एचआर, मेकॅनिकल, सिव्हिल, मार्केटिंग, कायदे, राजभाषा इत्यादी विभागामध्ये मॅनेजर, सिनिअर इंजिनिअर, सिनिएर ऑफिसर आणि ऑफिसर पदांसाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

कोठे आणि कसा अर्ज करायचा

इच्छुक उमेदवार गेल (इंडिया) लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर gailonline.com नोकरीसाठी अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी बुधवार (दि.7) पासून सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2021 आहे. उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क अर्ज करताना ऑनलाइन भरता येईल. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.gailonline.com/careers/currentOpnning/DetailedAdvtOpen220postsEnglishfinal.pdf

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://gailonline.com/CRApplyingGail.html

पदाचे नाव आणि एकूण पदांची संख्या

1. मॅनेजर (मार्केटिंग-कमोडिटी रिस्क मॅनेजमेंट) – 4 पदे
2. मॅनेजर (मार्केटिंग-इटरनॅशनल एलएनजी आणि शिपिंग) – 6 पदे
3. सीनियर इंजीनियर (केमिकल) – 7 पदे
4. सीनियर इंजीनियर (मेकॅनिकल) – 51 पदे
5. सीनियर इंजीनियर (इलेक्ट्रिकल) – 26 पदे
6. सीनियर इंजीनियर (इंस्ट्रुमेंटेशन) – 3 पदे
7. सीनियर इंजीनियर (सिव्हिल) – 15 पदे
8. सीनियर इंजीनियर (गेलटेल टीसी/टीएम) – 10 पदे
9. सीनियर इंजीनियर (बॉयलर ऑपरेशन) – 10 पदे
10. सीनियर इंजीनियर (पर्यावरण इंजीनियरिंग ) – 5 पदे
11. सीनियर ऑफिसर (ई अँड पी) -3 पदे
12. सीनियर ऑफिसर (सी अँड पी) -10 पदे
13. सीनियर ऑफिसर (बीआयएस) – 9 पदे
14. सीनियर ऑफिसर (मार्केटिंग) – 8 पदे
15. सीनियर ऑफिसर (एचआर) – 18 पदे
16. सीनियर ऑफिसर (कॉर्पोरेट कम्युनिकेशन) – 2 पदे
17. सीनियर ऑफिसर (लॉ) – 4 पदे
18. सीनियर ऑफिसर ( एफ अँड ए) – 5 पदे
19. ऑफिसर (प्रयोगशाळा) – 10 पदे
20. ऑफिसर (सिक्युरिटी) – 5 पदे
21.ऑफिसर (राजभाषा) – 4 पदे

Web Title : gail recruitment 2021 job opportunities gail mba engineer lawyer ba pass candidates 220 vacancies

 

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या