Gairee | ‘गैरी’ चित्रपटाचा ट्रेलर आउट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Gairee | हिंदी बरोबरच मराठी मध्ये देखील विविध विषयांवर प्रकाश टाकणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशाच पद्धतीचा ‘गैरी’ हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. उत्तम स्टारकास्ट असलेला निखळ मनोरंजनातून आदिवासींच्या समस्या मांडणारा आणि विचार करायला लावणारा हा सिनेमा. याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप टाकली आहे. (Gairee)

आदिवासी समाजातला एक तरुण डॉक्टर होऊ पाहत असतो त्याच्या या प्रवासात येणारे अडथळे, गोंधळ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे. तर या चित्रपटात अभिनेता मयूरेश पेम, नम्रता गायकवाड, प्रणव रावराणे, आनंद इंगळे, केतन पवार, समीर खांडेकर, सुनील देव, कृतिका गायकवाड आणि देविका दफ्तरदार हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. (Gairee)

 

या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन पांडुरंग बाबुराव जाधव यांनी केले आहे. युक्ता प्रॉडक्शन्स आणि द्विजराज फिल्म्स यांची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे. तर या चित्रपटाला गुरु ठाकूर आणि विष्णू थोरे यांनी गीतलेखन केले आहे. तर संगीत दिग्दर्शन अमित राज, मयुरेश केळकर यांनी केले आहे. तर नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले. तर वैशाली सामंत, अमित राज, धुरा कुंभार, ऋषिकेश शेलार यांनी गाणी गायले आहेत. तर पाश्‍वसंगीत मयुरेश केळकर यांनी केले आहे.

 

Web Title :- Gairee | gairee marathi movie pure entertainment social awareness gairee visit on 16th december

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Abdul Sattar On Thackeray Group | “एखाद्या महिलेनं मला चोर, गद्दार म्हंटलं तर कसं सहन करणार’? अब्दुल सत्तार यांचा प्रश्न

Bigg Boss Marathi | बिग बॉस मराठीच्या घरात ‘या’ कलाकारांनी घेतली वाईल्ड कार्ड एन्ट्री

BCCI-Guinness Book Of World Record | गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचा मोठा विश्वविक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली दखल