औरंगाबादमध्ये शिवसेनेचा नवा डाव, भाजपच्या खंद्या समर्थकालाच धरलं हाताशी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे नवी मुंबईतही भाजपला मोठं खिंडार पडणार असल्याची चिन्ह आहेत तर दुसरीकडे आता औरंगाबादमध्येही भाजपला गळती लागण्याची शक्यता आहे. ११ नगरसेवकांसोबत गजानन बारवाल यांनी भाजप ला पाठिबा दिला होता त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. भाजपला महानगरपालिका निवडणुकीआधी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भाजप समर्थक गजानन बारवाल यांनी काल रात्री भेट घेतली. २०१४ महानगरपालिका निवडणुकीत ११ अपक्ष नगरसेवकांसोबत गजानन बारवाल यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. सध्या ते कोट्यातून भाजप समितीचे अध्यक्ष आहेत. बारवाल हे भाजपला पाठिंबा न देता ते या वेळी शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे समजत आहे. उद्धव ठाकरे आणि बारवाल यांच्यात झालेल्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेर करण्यात आला आहे .

नवी मुंबई मध्ये हि भाजप ला मोठा धक्का बसणार आहे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना गणेश नाईक यांच्या गटाला सुरुंग लागणार आहे. नवी मुंबई महापालिका आणि राजकारणावर गेली अनेक वर्ष साम्राज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या साम्राज्यला सुरुंग लागला आहे.
भाजपच्या 5 नगरसेवकांनी बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व नगरसेवक शिवसेनेत जाण्याच्या मार्गावर आहेत. तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि त्याच्या सोबत असलेल्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यामुळे गणेश नाईकांना जोरदार धक्का बसला.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले गणेश नाईक यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीची नवी मुंबई महापालिकेत मागील अनेक वर्ष सत्ता आहे. नाईक हे सर्व त्यांच्या नगरसेवकांना घेऊन भाजप मध्ये आल्यामुळे अगोदरच्या भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्यायाला डावललं जात आहे असे बोलत त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याच बोलल जात आहे.

You might also like