नवी पेठेतील अमोल बधे खून प्रकरणी कुख्यात गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथीदारांची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील टोळी युद्धात गाजलेल्या अमोल बधे खून प्रकरणात मोक्कानुसार कारवाई केलेल्या कूविख्यात गजानन पंढरीनाथ  मारणे व त्याच्या 20 साथीदारांची  न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

पुणे :  विश्रामबाग येथे दाखल खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणे सह इतर आरोपींची पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

विशेष मोक्का न्यायाधीश श्री ए वाय थत्ते यांनी सदरील न्यायनिवाडा केला असून पुराव्याच्या अभावी सदरील आरोपींची मुक्तता केली असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. प्रस्तुत प्रकरणात आरोपीतर्फे ऍड सुधीर शहा, ऍड विजयसिंह ठोंबरे, ऍड विपुल धुशिंग व ऍड सिद्धार्थ पाटील यांनी कामकाज पाहिले आहे.

गजानन मारणे (वय 49), रुपेश कृष्णराव  मारणे (वय 31), मंदार उर्फ विकी सुरेश  बांदल (वय 26), बालाजी कमलाकर  कदम (वय 22), सागर श्रीरंग डिंबळे (वय 24), विक्रम विलास समुड्रे (वय 24), विशाल उर्फ गोट्या श्रीरंग डिंबळे (वय 25), राहुल उर्फ बंटी रामकृष्ण कळवणकर (वय 21), तुषार बधे (वय 32), आकाश अवचर (वय 21), अक्षय वेडे (वय 21), प्रतीक जाधव (वय 23), अक्षय जोरी (वय 21), स्वप्नील मापारे (वय 23), ओंकार जाधव (वय 21), विशाल धुमाळ (वय 28), योगेश मोहिते (वय 27) बाळकृष्ण उर्फ पंड्या मोहिते (वय 30) सोमप्रशांत पाटील (वय 42), सागर राजपुत, राकेश गायकवाड उर्फ बाब्या गुरुजी, तानाजी कदम, निखिल दुगाई, पप्पू उर्फ अतुल कुडले, सचिन ताकवले अशी निर्दोष मुक्तता केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली.

महत्वाचे –

अमोल बधेचा दि. 29 नोव्हेंबर 2014 रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील स्मशानभुमी रोडवरील कलावती मंदिराजवळ टोळी युध्दातून खून झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी 3 गावठी पिस्तुले, 2 काडतुसे आणि 11 लोखंडी कोयते जप्त केली होती. 10 मोबाइल हॅन्डसेट आणि वाहने असा एकुण तब्बल 5 लाख 32 हजार रूपयांचा माल पोलिसांनी जप्त केला होता.