×
Homeक्राईम स्टोरीGajanan Marne | कुख्यात गजानन मारणेची जेलमधून वर्षभरानंतर सुटका; जाणून घ्या प्रकरण

Gajanan Marne | कुख्यात गजानन मारणेची जेलमधून वर्षभरानंतर सुटका; जाणून घ्या प्रकरण

 नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एमपीडीए कायद्यांतर्गत (MPDA Act) पुण्यातील कुख्यात गजानन मारणे (Gajanan Marne) यांची नागपूर कारागृहात (Nagpur Central Jail) रवानगी करण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) गजानन मारणे (Gajanan Marne) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. त्याची मुदत आज संपल्याने गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv. Vijay Singh Thombre) यांनी दिली. गजानन मारणे याला सुरुवातीला येरवडा कारागृहात (Yerwada Jail) स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यानंतर त्याची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली होती.

 

 

कुख्यात गुंड गजानन मारणेची (Gajanan Marne) दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने त्याची तळोजा कारागृहातून (Taloja Jail) सुटका करण्यात आली. कारागृहातून बाहेर येतात कुख्यात गुंड गजानन मारणे टोळीने बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. तसेच आरडाओरडा करुन दहशत निर्माण केली. हा प्रकार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) उर्से टोल नाका (Urse Toll Naka) येथे घडला. याप्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे (Pune), पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि पुणे ग्रामीण पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे (FIR) दाखल करण्यात आले होते. (Pune Crime)

 

खून खटल्यात मुक्तता मिळाल्यानंतर गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली.
त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते.
त्यांनी महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस टाकत त्याची एक्सप्रेस हायवेवरुन जंगी मिरवणुक काढली.
यामध्ये 500 हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी झाल्या होत्या. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत (MCOCA Action) Mokka कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून मारणे तुरुंगात होता. मात्र, न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर मारणे जेलबाहेर आला होता. तब्बल 8 वर्षांनी पुन्हा गजानन मारणे जेलबाहेर असणार आहे.

 

Web Title :- Gajanan Marne | Infamous Gajanan Marane released from Nagpur central Jail after a year; The Pune Rural Police had made the placement under the MPDA Act

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 99 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

BCCI Announces Schedule For TATA IPL 2022 | आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई, चेन्नई वेगवेगळ्या गटात, पाहा कोणता संघ कोणत्या गटात; वाचा सविस्तर

 

PM Modi Visit To Pune | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख 10 मुद्दे

Must Read
Related News