तर कुख्यात गजानन मारणेची रवानगी नागपूर तुरुंगात करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणे याला येरवडा कारागृहात ठेवणे योग्य नसल्यास त्याला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात यावं असं म्हणणं कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी न्यायालयात मांडलं आहे.

कारागृह अधिक्षक यु.टी. पवार यांनी न्यायालयात हजर करण्यासाठी पैसे मागितले आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे. अशी तक्रार त्याने न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने कारागृह विभागाला आपलं म्हणणं सादर करण्यास सांगितले होते. त्यावर साठे यांनी आपले म्हणणे मांडले.

गजानन मारणे याने अर्जामध्ये पुर्वीच्या कोल्हापूर किंवा कळंबा कारागृहात हलविण्यात यावे अशी मागणी केली आहे. कोल्हापूर कारागृहातील बंदी संतोष पोळच्या प्रकरणात 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे तेथील सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कोल्हापूर कारागृहात त्याच्या टोळीतील २७ सहआरोपी आहेत. त्याला तेथे पाठविल्यास सर्वजण एकत्र येतील.

त्यामुळे त्याला प्रशासकिय कारणास्तव त्याला डिसेंबर 2018 मध्ये येरवडा कारागृहात वर्ग करण्यात आले आहे. तर येरवडा कारागृहातील यु. टी. पवार हे जबाबदार अधिकारी आहेत. त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव आहे. त्यांच्या साडेपाच हजार बंदी त्यांच्या निगराणी खाली आहेत. त्यामुळे गजानन मारणेला नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवा असे म्हणणे साठे यांनी मांडले. गजानन मारणेच्या वतीने ऍड. एन. डी. पाटील आणि ऍड. विजयकुमार ठोंबरे यांनी न्यायालयात बाजू मांडली.