‘शौर्य पुरस्कार’ जाहीर ! Top-3 मध्ये ‘जम्मू-काश्मीर’ आणि UP पोलीस

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : शौर्य व सेवा पुरस्कार जाहीर झाले आहेत. जम्मू-काश्मीर पोलीस शौर्य पुरस्कारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 81 पदकांची नोंद केली गेली आहे. यानंतर दुसर्‍या क्रमांकावर सीआरपीएफ (55 पदके) आणि तिसर्‍या क्रमांकावर उत्तर प्रदेश पोलीस (23 पदके) आहे. गृह मंत्रालयाने शौर्य व सेवा पुरस्कारांची यादी जाहीर केली आहे.

गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या यादीनुसार, झारखंड पोलीस 24, आसाम पोलीस 21, गुजरात पोलीस 19, कर्नाटक पोलीस 18, आंध्र प्रदेश पोलीस 16, छत्तीसगड पोलीस 14, हरियाणा पोलीस 12, अरुणाचल प्रदेश पोलीस 4, हिमाचल प्रदेश पोलीस 4 आणि गोवा पोलिसांना एक शौर्य आणि सेवा पुरस्कार मिळालेला आहे.

याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश पोलीस 102, महाराष्ट्र पोलीस 58, तामिळनाडू पोलीस 23, पश्चिम बंगाल पोलीस 21, मध्य प्रदेश पोलीस 20, राजस्थान पोलीस 18, पंजाब पोलीस 15, ओडिशा पोलीस 14, तेलंगणा पोलीस 14, मणिपूर पोलीस 7, केरळ पोलीस 6, त्रिपुरा पोलीस 6, उत्तरखंड पोलीस 4, मिजोरम पोलीस 3, सिक्किम पोलीस 2 आणि नागालँड पोलिसांना एक शौर्य आणि सेवा पुरस्कार मिळालेला आहे.

तसेच जम्मू-कश्मीर पोलीस 96, दिल्ली पोलीस 35, अंदमान निकोबार पोलीस 2, लक्षद्वीप पोलीस 2, चंडीगड पोलीस एक आणि पुदुचेरी पोलिसांना एक शौर्य आणि सेवा पदक मिळालेले आहे.

त्याचबरोबर सीआरपीएफला 118, बीएसएफ 52, आयबी 36, सीबीआय 32, सीआयएसएफ 25, आयटीबीपी 14, एसएसबी 12, आसाम राइफल्स 10, एसपीजी 5 आणि एनएसजीला 4 शौर्य आणि सेवा पदक मिळालेले आहेत. या वर्षी 215 शौर्य पुरस्कार आणि 711 सेवा पदक देण्यात आले आहेत.