धक्‍कादायक ! बाथरूममध्ये ‘छुपा’ कॅमेरा लावून मित्रानेच ‘रेकॉर्ड’ केले मॉडलचे ‘न्यूड’ व्हिडीओ

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – अमेरिकेतील कॅलिफॉर्निया येथे एका इन्स्टाग्राम इन्फ्लूएंसर आणि फिटनेस मॉडेल जोई क्लोफर हिने एका फोटोग्राफरवर तिचा न्यूड व्हीडिओ काढल्याचा आरोप केला आहे. ज्या फोटोग्राफरने हे कृत्य केले आहे, त्याला जोई ओळखते, असंही तिने सांगितले आहे. तसंच त्याने अजून काही महिलांचे न्यूड व्हीडिओ केल्याचा आरोपही तिने केला आहे.

ही गोष्ट तिने इंस्टाग्राम अकांउंटवर एका पोस्टमध्ये सांगितली आहे. या फोटोग्राफरचे नाव विलियम फ्रांसिस असं नाव सांगितलं आहे. जोईने सांगितल्यानुसार विलियमने मोबाईल चार्जरच्या आकाराचा कॅमेरा बाथरूममध्ये लावला होता. जेव्हा हा कॅमेरा असल्याचे जोईच्या लक्षात आले, तेव्हा तिने त्यातील मेमरी कार्ड काढून लॅपटॉपला लावून पाहिले. त्यात तिला तिच्यासह इतर महिलांचे एकूण २५९ व्हीडिओ होते. हे सांगताना जोईने एक व्हीडिओ टाकला आहे. ज्यात विलियम कॅमरा लावताना दिसत आहे.

तसंच इतर महिलांना सावधान करण्यासाठी तिने ही माहिती उघड केल्याचे सांगितलं. हा व्यक्ती हायप्रोफाईल मॉडेलसचे फोटो शुट करतो. त्यामुळे या फोटोग्राफरचे सत्य समोर आणले पाहिजे. त्यासाठी तिने कठोर पाऊल उचलत पोलीसांकडे तक्रार देखील दिली आहे.

जोई विलियमला चांगला मित्र समजत होती. तीचा त्याच्यावर विश्वास होता. ती जेव्हा त्याच्या शहरात राहण्यासाठी आली तेव्हा त्याने तिला आपल्या घरी राहण्याचा आग्रह केला. त्यामुळे ती त्याच्या घरी राहू लागली दोघाचे रूम आणि बाथरूम वेगवेगळे होते. ती तिथे राहाण्यासाठी गेल्यानंतर १९ दिवसांनी ती जेव्हा बल्ब बदलत होती. तेव्हा तिला तो हिडन कॅमेरा दिसला. त्यानंतर तिच्यासमोर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान, जोई या फोटोग्राफरवर केस करण्याच्या तयारीत असून त्याने अद्याप याविषयावर काही सांगितलेले नाही.

आरोग्यविषयक वृत्त