बुधगाव मध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 24 जणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – मिरज तालुक्यातील बुधगाव येथे ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये चालणारा तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. जुगार मालक अमिर खुदबुद्दीन शेरकर (वय 42, रा. वनवासवाडी, बुधगाव) यांच्यासह 24 जणांना अटक करण्यात आली. रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली असा पाच लाख 90 हजार 778 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेरकर याच्यासह सर्जेराव बाबुराव पाटील, गणेश पाटील, शीतल आवळे, प्रवीण जाधव, सतीश देसाई, नाथा कांबळे, सागर आवळे, दीपक लोंढे, विजय चव्हाण, दीपक कदम, दीपक मोरे, संजय भंडारे, सागर देसाई, दीपक केंगार, रंगराव चंदनवाले, आनंद हत्तेकाठ, नसरूद्दीन शेरकर, शहारूख सय्यद, सदाम शेरकर, संतोष पाटील, विजय ओलेकर, तोसिफ ऊर्फ राजू शेरकर, किरण देवकुळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बुधगावमधील ग्रामपंचयातीच्या मागील बाजूस असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार अड्डा असल्याची माहिती एलसीबीच्या पथकास मिळाली. त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथक त्याठिकाणी रवाना करण्यात आले. पथकाने काल रात्री छापा टाकला. त्याठिकाणी मालक शेरकर असल्याचे निष्पन्न झाले. त्याठिकाणी जुगार खेळणाऱ्या 23 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अडीच हजार रुपयांचे 28 कॅट बॉक्‍स, 86 हजार 180 रुपयांची रोकड, 73 हजार 500 रुपयांचे 19 मोबाईल, 4 लाख 25 हजार रुपयांचे 12 मोटारसायकली असा 5 लाख 90 हजार 778 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, सागर पाटील, युवराज पाटील, बिरोबा नरळे, विशाल भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : Policenama.com 

 

Loading...
You might also like