पोलीस, शिक्षक, वनाधिकारी खेळत होते जुगार, पोलिसांनी छापा टाकून केली अटक

दरव्हा/यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – दरव्हा पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दारव्हा पोलिसांनी तालुक्याच्या उमरी इजारा येथील शेतशिवारात धाड (raid) टाकून 8 जुगाऱ्यांना (Gamblers) अटक (arrest) केली. पोलिसांनी अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये अमरावती येथे कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी (police), येथील शिक्षक (teacher) आणि एका वन कर्मचाऱ्याचा (forest worker) समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींकडून 31 हजार रुपये रोख, सहा मोबाईल, चार दुचाकी, एक चारचाकी असा एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अभिनंदन दुलसिंग राठोड (वय-35 रा. आरंभी ता. दिग्रस), दादाराव शामराव पवार (वय-60 रा. खेड ता. दारव्हा), पांडुरंग भीका राठोड (वय-50 रा. आरंभी ता. दिग्रस), नरेश तुळशीराम माहुरे (वय-35 रा. लाखडिंड ता. दारव्हा), भास्कर गुलाब काटे (वय-48), इंद्रजीत बळीराम राठोड (रा. उमरीईजारा) व अभिमन्यू बाबाराव आडे (वय-47 रा. उमरी इजारा ता दारव्हा जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या पैकी अभिनंदन राठोड हा वन कर्मचारी आहे. भास्कर काटे हा शिक्षक तर इंद्रजीत राठोड हा पोलीस कर्मचारी असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे. दरव्हा एसडीपीओ उदयसिंह चंदेल, ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल सांगडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.