Game Over Teaser : तापसी पन्‍नूच्या ‘रहस्य’मय चित्रपटाची गोष्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गेम ओवर’ चा धमाकेदार टीजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तापसी वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘गेम ओवर’ चित्रपटाचा टीजर हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित झाला आहे.

दोन दिवसा आधी याचे नवीनवीन पोस्टर समोर आले. या पोस्टरला पाहून असे वाटते की, हा चित्रपट थ्रिलर असू शकतो. मंगळवारी सोशल मिडियावर ‘गेम ओवर’ चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करुन चित्रपटाची माहिती दिली गेली. चित्रपटाची कथा एक थ्रिलर आणि सस्पेंस व मृत्यूच्या खेळावर आधारित आहे.

टीजरमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री तापसी पहिली नॉरमल जीवन जगत असते. मग नंतर तिच्यासोबत असे काही घडत जाते की, एक वेळ अशी येते तिच्यावर मृत्यूची सावली पडते. टीजर पाहून प्रेक्षकांना याची कहानी समजत नाही यासाठी प्रेक्षक चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत आहे.

‘गेम ओवर’ चित्रपटातील तापसी पन्नूचा लूक आधीच दाखवला गेला आहे. तापसी सध्या चित्रपट ‘सांड की आंख’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तापसीसोबत अभिनेत्री भूमि पेडनेकर दिसणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like