ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहराचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते उत्थापन पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रथ ओढून मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली.
 विशाल गणपतीची मिरवणूक ही पहिली मानाची मिरवणूक मानली जाते. ही मिरवणूक निघाल्यानंतर अहमदनगर मधील इतर गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होती. आज विशाल गणपतीच्या मंदिरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर विशाल गणपतीचा रथ ओढून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली.
पारंपारीक वाद्यांसह ढोल आणि ताशांच्या गजरात आणि महिलांनी धरलेल्या दांडियाच्या तालावर  मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी देखील ताशा वाजवून गणपती बाप्पाला निरोप दिला. मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त या मिरवणूकीत सहभागी झाले आहेत.