इंग्रजी बोलणाऱ्या ‘या’ आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल, नेटकरी म्हणतात शशी थरूर यांनी भेटायला पाहिजे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड चित्रपटामध्ये एक डायलॉग प्रसिद्ध आहे. जो तुम्ही ऐकला असेल आणि कधी तरी बोलला देखील असेल. ‘आय टॉक इंग्लिश, आय वॉक इंग्लिश, आय लाफ इंग्लिश’ हा डायलॉग सर्वांनाच माहित असेल. आज एका आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ही आजी महात्मा गांधी जगात महान असल्याचे सांगत आहे, ते देखील इंग्रजीमध्ये. आजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आजी लाल साडीत दिसत आहे. यामध्ये ती इंग्रजीमध्ये महात्मा गांधी यांच्या बाबतीत सांगत आहे. ती म्हणते गांधी अगदी सामान्य कुटुंबातील होते. ते साधे व्यक्तीमत्व होते आणि साधे अन्न खात होते. ते बकरीचे दुध पित होते. ते राष्ट्राचे जनक आणि हिंदु मुस्लिमांवर प्रेम करणारे होते, असे आजी सांगत आहेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात पाहण्यात आले. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपले मत यावर दिले आहे. एका युजरने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर शशी थरूर यांनी या आजीला एकदा भेटले पाहिजे अशी कमेंट केली आहे. तर काहींनी या आजीला 10 पैकी 10 मार्क देऊन तुम्ही किती मार्क देणार अशी विचारणा केली आहे.