Gandhi Talks Teaser | साऊथ सुपरस्टारसोबत झळकला मराठमोळा सिद्धार्थ जाधव; गांधी जयंतीनिमित्त केली ‘हि’ मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Gandhi Talks Teaser | आज 2 ऑक्टोबर असल्याने सगळीकडे गांधी जयंती (Gandhi Jayanti) साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे सगळीकडे आज गांधीमय वातावरण झाले आहे. या दिवसाच्या निमित्ताने मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddarth Jadhav) आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. यावेळी सिद्धार्थने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा करत त्याचा टीझर (Gandhi Talks Teaser) शेअर केला आहे.

 

सिद्धार्थ जाधवनं या चित्रपटांचा टीझर त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), विजय सेतूपती (Vijay Sethupathi), अरविंद स्वामी (Arvind Swamy), आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) या कलाकारांसोबत काम करणार आहे. त्याच्या आनंदाच्या बातमीने त्याचे चाहते खूप खूश आहेत. या चित्रपटाचे नाव ‘गांधी टॉक्स (Gandhi Talks Teaser) असे आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शक किशोर पांडुरंग बेलेकर (Directed by Kishore Pandurang Belekar) यांनी केलं आहे. हा एक डार्क कॉमेडी असेल असे टीझरमध्ये सांगण्यात आले आहे.

 

‘गांधी टॉक्स हा एक मूकपट असणार आहे. म्हणजेच यात कोणताही कलाकार काहीही बोलताना दिसणार नाही.
हावभाव आणि हावभावातच अभिनय केला जाणार आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी आणि
मल्याळम व्यतिरिक्त मराठी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी लोकांच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Web Title :- Gandhi Talks Teaser | marathi actor siddharth jadhav in gandhi talks movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shahajibapu Patil | सगळेच आनंद दिघे नसतात, पण त्यांचे कार्य पुढे नेणारा एखादाच…, शहाजी पाटलांचे शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर

 Ashish Shelar | सचिन वाझे हे शिवसेनेचे कार्यकर्ते, हे ऑन रेकॉर्ड स्पष्ट, आशिष शेलारांचा आरोप

Maharashtra CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, यंत्रणा सतर्क