ICU मध्ये ‘अ‍ॅडमिट’ झाली ‘गंदी बात’ फेम अभिनेत्री, 48 तासापासुन करत होती ‘शुटिंग’, पडली ‘बेशुध्द’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीव्ही अभिनेत्री गहना वसिष्ठची प्रकृती ठिक नाह असे समजत आहे. सध्या ती व्हेंटिलेटरवर आहे. गहना गुरुवारी वेब सीरीजच्या शुटींगदरम्यान दुपारी 4.30 मिनिटांनी अचानक बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर तिला आयसीयुमध्ये भरती केलं गेलं. एका रिपोर्टनुसार गहनाची प्रकृती गंभीर आहे.

रक्षा हॉस्पिटलचे डॉक्टर प्रणव काबरा म्हणाले, “गहना इनिशियल ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नाहीये. तिला श्वास घ्यायलाही त्रास होत आहे. तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. सध्या मात्र तिची प्रकृती गंभीर आहे. तिला अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात आलं आहे.”

पुढे बोलताना डॉक्टर म्हणाले, “मिळालेल्या माहितीनुसार, गहना जवळपास 48 तास शुटींग करत होती. यावेळी तिनं नीट खाल्लपिल नव्हतं. आम्ही तिच्या काही टेस्ट करत आहोत. तिला डायबिटीस आहे. तर तिचा बीपी खूपच कमी आहे.”

आणखी माहिती देताना ते म्हणाले, “मी सध्या काहीच सांगू शकत नाही. आम्ही सध्या टेस्ट रिपोर्टची वाट पहात आहोत. आम्हाला असं समजलं आहे की, तिनं काही एनर्जी ड्रिंक्स घेतलं आहे. ती डायबिटीस आणि इतरही आजारांवर औषध घेत होती. अद्याप हे मात्र समजू शकलेलं नाही की, तिनं जे काही खाल्लं आहे त्याचं रिअ‍ॅक्शन आहे की आणखी काही आहे. सध्या आम्ही टेस्ट रिपोर्टची वाट पहात आहोत.”

ज्यांनी गहनाला रुग्णालयात नेलं होतं ते सांगतात की, गहनानं केवळ एनर्जी ड्रिंक्स घेतलं होतं. तिनं 36 तास काहीच खाल्लं नव्हंत.

गहनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच गहना अल्ट बालाजीच्या गंदी बात या वेब सीरीजमध्ये झळकली होती. याशिवाय स्टार प्लस वाहिनीवरील शो बहनें मध्येही तिनं लिड रोल केला आहे. 2012 मध्ये तिनं मिस एशिया बिकीनी कंटेस्टेंटचं टायटलही जिंकलं होतं. गेल्या 5 वर्षांत तिनं 30 हून अधिक साऊथ सिनेमात काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/B49eukVFsHJ/

Visit : Policenama.com