Gandi Baat Fame | ‘गंधी बात’ फेम अभिनेत्रीला हृदयविकाराचा दुसरा झटका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – ‘गंधी बात’ फेम (Gandi Baat Fame) अभिनेत्री गहना वशीष्ठला (Gehana Vasisth) हृदयविकाराचा झटका आला आहे. तिच्यावर मुंबईतील एका हाय प्रायवेट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गहनाला शनिवारी हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जात आहे. परंतु ही माहिती आज समोर आली आहे. गहना मागच्या आठवड्यातच जामिनावर बाहेर आली होती. ‘गंधी बात’ (Gandi Baat Fame) या अडल्ट शोमुळे गहना लोकप्रिय झाली होती.

गहनाला दुसरा हृदयविकाराचा झटका

गहनाला तिच्या हॉट आणि बोल्ड (Hot and bold) अंदाजासाठी ओळखलं जातं. गहनाला डायबिटीज असून तिला वेळेवर इन्शुलंस देणे आवश्यक आहे. वेळेवर इन्शुलंस मिळाले नाही तर तिची प्रकृती खूपच खराब होते. अशातच शनिवारी तिला हृहदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गहनाच्या जवळच्या एका व्यक्तीने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे गहनला आलेला हृदयविकाराचा झटका हा दुसरा झटका आहे. याआधीही तिला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी तिला तीन दिवस ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. सध्या तिची परिस्थिती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

नुकताच मिळाला होता जामीन

पॉर्न व्हिडीओ (Porn video) बनवणे आणि ते इंटरनेटवर अपलोड करण्याच्या आरोपाखाली गहना गेल्या अनेक दिवसांपासून जेलवारी करत आहे. याच संदर्भात तिला मडगाव पोलिसांनी (Madgaon police) नुकतीच अटक केली होती. गेल्या आठवड्यातच ती जामिनावर बाहेर आली होती. गहना ही मुळची छत्तीसगडची राहणारी असून तिने मिस आशिया बिकिनीचा किताब पटकावला आहे.

Web Title : gandi bat fame actress gahana vashisht hospitalised from heart attack read news

हे देखील वाचा

Woman Care | ‘हे’ ६ पौष्टिक घटक महिलांना अनेक आजारांपासून रक्षण देतात, जाणून घ्या

Menopause | रजोनिवृत्तीत (मेनोपॉज) काय खावे आणि काय टाळावे ‘हे’ जाणून घ्या

Cesarean Delivery | ‘सिझेरियन’नंतर महिलांचा आहार कोणता असावा? जाणून घ्या काय खावे आणि काय नाही

Anti Corruption Bureau। पोलीस अधिकाऱ्याने जमवली बेहिशेबी मालमत्ता; 15 वर्षांत उत्पन्नापेक्षा 28.57 टक्के जास्त संपत्ती, ACB च्या चौकशीत समोर