Video : ‘न्यूड’ आणि ‘बोल्ड’ सीन्सने खचाखच भरलेल्या ‘गंदी बात 3’चा ट्रेलर ‘आउट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये सध्या वेब सीरीज जोरात सुरु आहेत. अनेक दिग्गजही या मैदानात उतरले आहेत. एकापाठोपाठ एक अशा अनेक वेब सीरीज येत आहेत. सध्या एकता कपूरच्या गंदी बात या वेब सीरीज जोरदार चर्चा सुरु आहे. ही वेब सीरीज अति बोल्ड आहे. या सीरीजच्या तिसऱ्या सीजनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या हा ट्रेलर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

गंदी बात 3 चा ट्रेलर पाहता लक्षात येत आहे की, सीजन 3 आधीच्या सीजनपेक्षाही बोल्ड असणार आहे. यामध्ये लेस्बियन रोमँस सेक्स सीन्सही आहेत असे दिसत आहे.

स्पष्ट भाषेत सांगायचे झाले तर गंदी बात 3 मध्ये बोल्डनेस आणि अश्लीलतेच्या सर्वच मर्यादा पार केल्या आहेत असे म्हटले जात आहे. सध्या या ट्रेलरची भरपूर चर्चा सुरु आहे. हा ट्रेलर इतका व्हायरल झाला आहे की, एका दिवसात 14 लाखांहून अधिक लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे.

गंदी बात सीजन 3 च्या या 2 मिनिट 50 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूड सीन्स तर आहेतच शिवाय यात मोठ्या प्रमाणात शिव्यांचाही वापर केला आहे. याशिवाय या ट्रेलरमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत, ज्यात बेडरूम सीन, न्यूड आणि सेमी न्यूड सीन्सचा समावेश आहे. सध्या हा ट्रेलर वाऱ्यासारखा व्हायरल होताना दिसत आहे. शिवाय सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.