कोरियोग्राफर गणेश आचार्यची सुंदर पत्नी तुम्ही पाहिलीत का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बड्या कलाकारांनाही आपल्या तालावर थिरकायला लावणारा नृत्य दिग्दर्शक गणेश आाचार्यला आपण सर्वजण ओळखतोच. गणेश आचार्य प्रसिद्ध कोरियोग्राफर कृष्ण गोपी यांचा मुलगा आहे. त्यामुळे गणेश आचार्यला घरातूनच नृत्य दिग्दर्शनाचा वारसा मिळाला आहे. अनेकांना हे माहिती नसेल, बहिण कमलकडून नृत्याचे धडे गिरवणाऱ्या गणेशने अवघ्या १९ व्या वर्षी कामाला सुरुवात केली आहे. अनाम या १९९२ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमासाठी गणेशने पहिल्यांदा कोरियोग्राफर म्हणून काम केले. या संधीचं गणेशने सोनं केलं आणि आपल्या नृत्य दिग्दर्शनाच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे का की, गणेश आचार्यने जशी आपली वेगळी जागा तयार केली आहे तशीच काहीशी जागा गणेशच्या पत्नीनेही केली आहे. विधी आचार्य असं त्याच्या पत्नीचं नाव आहे.

जसं गणेशने कोरियोग्राफर म्हणून कामाला सुरुवात केली होती तसंच विधीनेही दिग्दर्शिका म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकले आहे. हे ब्रो असं विधीने दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात गणेशने कामही केलं आहे. त्याने या सिनेमातील एक रोल केला आहे. गणेश आणि विधीला एक कन्यारत्न आहे. सौंदर्या असं त्यांच्या लाडक्या मुलीचं नाव आहे.

बॉलिवूडमध्ये अनेक गााजलेल्या गाण्यांसाठी कोरियाग्राफी करणाऱ्या गणेशने अनेक मोठ्या कलाकारांना आपल्या कोरियोग्राफीवर थिरकायला लावले आहे. यामध्ये बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि मनिषा कोईराला यांसारख्या नावांचाही समावेश आहे. लज्जा सिनेमातील बडी मुश्किल है या गाण्यासाठी त्याने नृत्य दिग्दर्शन केले आहे. याशिवाय ऐसा जादू डाला रे, बीडी जलयले, रंग दे बसंती अशा अनेक हिट गाण्यांची कोरियोग्राफी गणेशने केली आहे.

गणेश आचार्यच्या अभिनयाबद्दल सांगायचे झाले तर, ABCD या सिनेमात त्याने आपल्या अभिनयाचीही झलक दाखवली आहे. मराठी सिनेमातही गणेशने दिग्दर्शक म्हणून यशस्वीरित्या पाऊल टाकले आहे. ‘भिकारी’ असं त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचे नाव आहे. स्वप्नील जोशी आणि रुची इनामदार यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

 

नियमित तोंडाची स्वच्छता ठेवल्यास अनेक आजार राहतील दूर

तंदुरुस्त राहण्यासाठी वेळापत्रकात करा थोडासा बदल

कांबळे दुहेरी हत्याकांडातील तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण