Ganesh Bidkar | मुळा- मुठा नदीचे रुपडे पालटायचे असेल तर पुणेकरांना काही बदल स्वीकारावे लागणार ! पर्यायी उपाययोजना करण्यासाठी भाजप कटीबद्ध – सभागृह नेते गणेश बिडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ganesh Bidkar | मुळा- मुठा नदी सुधार योजनेमध्ये (mula mutha riverfront development) छोटे उड्डाणपुल पाडावे लागतील व कडेचे रस्तेही बंद होणार आहेत. शहरातील नदीचे रुपडे पालटायचे असेल तर बदल पुणेकरांना स्वीकारावे लागणार आहेत. परंतू यासाठी पर्यायी उपाययोजना करण्यासाठी भाजप कटीबद्ध आहे, असा दावा महापालिकेतील (Pune Corporation) सभागृहनेते व गटनेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

 

मुळा- मुठा नदी सुधार योजनेचे काम करताना बाबा भिडे पुल व इतर कॉजवे पाडावे लागणार आहेत. तसेच नदी काठचा सध्या अस्तित्वात असलेला रस्ताही बंद करण्यात येणार आहे. याला पर्याय म्हणून भिडे पुलाची उंची वाढविणे तसेच दोन्ही तिरांवर पर्यायी रस्ते निर्माण करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाने बुधवारी सादरीकरणाच्यावेळी स्पष्ट केले. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

 

यासंदर्भात बोलताना सभागृह नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) म्हणाले, की नदी सुधार महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. नवीन प्रकल्प करताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. नदी पात्रात कायम पाणी ठेवायचे असेल तर आंतरराष्ट्रीय डिझाईनप्रमाणे काही बदल स्वीकारावे लागतील. बाबा भिडे पुल लगेच पाडला जाणार नाही. त्याठिकाणी पर्यायी पूल बांधण्याचे नियोजन करता येईल. अनेक वर्षे आपण नदी सुधार ऐकत आलोय. अनेक अडथळे पार करत आपण येथे आलोय. पुढेही ते अडथळी पार करून पुणेकरांना सुदृढ आणि सुंदर नदी देण्याचा आमचा प्रयत्न राहील. या योजनेअंतर्गत सांडपाण्याच्या लाईन्स जायका प्रकल्पा अंतर्गत नदीच्या काठावरून एस.टी.पी. प्लँन्ट पर्यंत नेण्यात येतील. त्यामुळे नदी सुधार (जायका) आणि नदी काठ सुधार हे दोन्ही प्रकल्प एकाचवेळी सुरू करण्यात येतील. नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत ११ एसटीपी प्लँन्ट बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी ९ प्लँन्टच्या जागा ताब्यात आल्या आहेत व उर्वरीत दोन जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हे दोन्ही प्रकल्प आम्ही गतीने मार्गी लावणार आहोत.

 

 

भिडे पूल व नदी पात्रातील रस्ता बंद झाल्यास काय परिणाम होणार?
मुठा नदीवरील बाबा भिडे पुल (Baba Bhide Bridge) पाडल्यानंतर तसेच नदी पात्रातील रस्ता बंद झाल्यानंतर कर्वेनगर (Karve Nagar), कोथरूड (Kothrud), सिंहगड रस्ता (Sinhagad Road) परिसरातील नागरिकांना शनिवार पेठ (Shaniwar Peth), नारायण पेठ (Narayan Peth) तसेच मध्यवर्ती शहरात जाण्याचा एक सुलभ मार्ग बंद होणार आहे. तसेच या रस्त्यावर पार्क होणार्‍या शेकडो मोटारींनी शहरातील मध्यवर्ती रस्ते व्यापगत होउन मध्यवर्ती शहरात प्रचंड वाहनकोंडी होणार आहे.

प्रशासनाने सुचविलेल्या रस्ता रुंदीला स्थानीक नगरसेवकांनी केलेला विरोधच मुळावर आला!
महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये (PMC Development Plan) कर्वेरस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापासून गरवारे महाविद्यालयाच्या इमारतीमागून, राजपूत झोपडपट्टी येथून म्हात्रे पुलापलिकडे डीपी रस्त्याला जोडणारा ३० मी. रुंदीचा डीपी रस्ता आखण्यात आला आहे.
महापालिकेच्या मूळ आराखड्यात आणखी अलिकडे असलेला हा रस्ता तत्कालीन स्थानीक दोन ‘बड्या नगरसेवकांनी’ हरकत घेउन
नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये ढकलल्याने तो ‘न्यायालयीन’ कचाट्यात अडकल्याने तो होणे तसे कठीण आहे.
दुसरीकडे प्रशासनाने केलेल्या विकास आराखड्यामध्ये नारायण पेठेकडील संभाजी चौकीपासून ओंकारेश्‍वर घाटापर्यंत रस्ता रुंदी दर्शविली होती.
मात्र, मागील राज्य शासनाने ही रस्ता रुंदी रद्द केल्याने या मार्गाचाही पर्यायी मार्ग होण्यात अडचणी येणार आहेत.
या पार्श्‍वभूमीवर प्रशासनातील अधिकार्‍यांकडे विचारणा केली असता,
त्यांनी पुन्हा कलम ३७ (१) नुसार रस्ता रुंदीकरणाच्या पर्यायाचा विचार करावा लागेल, असे स्पष्टीकरण दिले आहे.

 

Web Title :- Ganesh Bidkar | If you want to change the shape of Mula-Mutha river, Punekars will have to accept some changes! BJP committed to take alternative measures – House Leader Ganesh Bidkar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rajinikanth | मुलीच्या घटस्फोटामागोमाग सुपरस्टार रजनीकांत यांना आणखी एक धक्का

 

Asaduddin Owaisi | ‘मेरठ येथून परत येताना गाडीवर गोळीबार, 4 राऊंड केले फायर’ – असदुद्दीन ओवेसींचा दावा

 

Deccan Queen Express | रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! मुंबईत 72 तासांचा ब्लॉक; 4 दिवस डेक्कन क्वीन रद्द