आले गणराय ! गणेश मंडळ घेत आहेत ‘विमा’ संरक्षण, ‘लालबागच्या राजा’चा विमा तब्बल 51 कोटींचा

नवी दिल्ली: गणेश चतुर्थी उत्सव यंदा २ सप्टेंबर पासून साजरा केला जाईल. त्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. विशेषत: देशाची आर्थिक राजधानी मुंबई गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे. ही जय्यत तयारी केवळ उत्सवासाठीच नाही तर सुरक्षिततेसाठी देखील आहे. खरं तर, मीडिया रिपोर्टनुसार, गणपती मंडळांचा मोठ्या प्रमाणात विमा उतरविला जात आहे. कोणत्याही अनुचित घटनेपासून बचाव करण्यासाठी लाखो कोटींचा विमा उतरविला गेला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षापेक्षा जास्त रकमेचा विमा उतरवला गेला आहे.

विमा कंपन्याही याकडे पैसे मिळवण्याची संधी म्हणून पहात आहेत :
विमा कंपन्या दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवासाठी खास विमा संरक्षण तयार करतात. प्रत्येक गणपती मंडळाच्या वेगवेगळ्या आकार आणि आवश्यकतेनुसार पॉलिसी तयार केली जाते. बाप्पांना भक्तांकडून मिळालेल्या ऑफरिंग्ज, दागिन्यांचा मोठ्या प्रमाणात विमा उतरवला जातो. यासह, आग, चोरी, दहशतवादी घटना किंवा प्रसाद खाण्यामुळे आजारी पडल्यास कोणत्याही प्रकारच्या दुर्घटनेसाठी गणपती मंडळाने स्वयंसेवकांचा विमा काढला आहे.

लालबागच्या राजाला ५१ कोटींचे पॉलीसी संरक्षण :
जीएसबी किंग सर्कलच्या मंडळाने मागील वर्षीच्या २६४ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा २६६ कोटींचा विमा संरक्षण घेतला आहे. जीएसबी वडाळानेही यावर्षी आपले विमा संरक्षण ५० कोटी रुपयांवरून ५५ कोटी रुपये केले आहे. लालबागच्या राजाने गेल्या वर्षी ५१ कोटी रुपयांचा विमा संरक्षण घेतले होते. यंदाही लालबागच्या गणपती मंडळाने याच रकमेचा विमा घेतला आहे. मुंबईच्या किंग गणेश मंडळाने यंदा ७.५ कोटींचा विमा उतरविला आहे. मागील वर्षीही त्यांचे साडेसहा कोटी रुपयांचे विमा कव्हर होते. बॉलिवूडचा आवडता मानल्या जाणाऱ्या अंधेरीच्या राजाच्या विमा संरक्षणाची रक्कमही यावर्षी वाढविण्यात आली आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मुर्तीची स्थापना कोणत्या वेळेत करावी ?
फक्त देखावाच नाही तर सामाजिक कार्यातही पुढे असणारा ‘तुळशीबाग गणपती’
यंदाच्या गणेश मूर्तींत ‘PUBG’ आणि ‘हेल्मेटधारी’ गणपतीचा ‘बोलबाला’
पुण्यातील मानाच्या पहिल्या ‘कसबा’ गणपतीच्या स्थापनेचा ‘इतिहास’ आणि ‘मानक’ कथा