श्री गणेश व महालक्ष्मी स्थापनेसाठी ‘मुहूर्त’

पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरात सर्वत्र गणपती आरास आणि सजावटीसाठी लगबग सुरु आहे. गणेशाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सोमवारी , 2 सप्टेंबरला होत असून, या दिवशी सूर्योदयापासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त आहे.

महालक्ष्मी पूजन
महालक्ष्मीचे अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मू ळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते. 5 सप्टेंबर रोजी कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मीचे आवाहन करावे. या दिवशी सायंकाळी 6.34 पर्यंत वैधृती योग आहे. परंतु महालक्ष्मी स्थापनेस वैधृती योगाचा दोष नाही. शुक्रवारी, 6 सप्टेंबर रोजी दिवसभर ज्येष्ठा नक्षत्र आहे. या दिवशी दुपारी अथवा सायंकाळी महालक्ष्मीचे पूजन, महानैवेद्य करावा. 7 सप्टेंबर रोजी दिवसभर मूळ नक्षत्र आहे. त्यामुळे आपल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मीचे विसर्जन करावे.

आरोग्यविषयक वृत्त –