घरच्या घरी झटपट बनवा ‘चॉकलेट’ मोदक ! जाणून घ्या रेसिपी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गणेशोत्सवात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. (Modak) अनेकांना मोदक खायला खूप आवडतं. उत्सवा व्यतिरीक्त तुम्ही इतर दिवशीही मोदक बनवू शकता. काही लोक चॉकलेटचे (chocolate) खूपच शौकीन असतात. जर मोदक आणि चॉकलेट या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर? म्हणजेच जर तुम्हाला चॉकलेटचे मोदक खायला मिळाले तर? होय आज आपण चॉकलेटचे मोदक कसे बनवायचे याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य –

– पाव कप खवा (करोडा करून घेतलेला)

– पाव कप पिठीसाखर

– दीड ते दोन चमचे कोको पावडर

कृती –

– कोरड्या केलेल्या खव्यात पिठीसाखर एकत्र करा.

– एका वेळी एक चमचा कोको पावडर घाला आणि एकत्र करा.

– पुन्हा एक चमचा कोको पावडर घाला आणि एकत्र करा.

– जोवर मिश्रण घट्ट होत नाही तोवर त्यात कोको पावडर घाला.

– जेव्हा हे मिश्रण घट्ट होईल तेव्हा त्याला मोदकांप्रमाणे आकार द्या आणि मोदक तयार करून घ्या.