उरुळी कांचन येथे बाप्पाला भावपूर्ण निरोप

उरुळी कांचन : पोलीसनामा ऑनलाईन (हनुमंत चिकणे) – ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ गजरात उरुळी कांचन (ता. हवेली ) व परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

सर्व सार्वजनिक मंडळांनी मंडळांनी मिरवणूक रथांची आकर्षक व भव्य सजावट केली होती. लोणी काळभोर पोलिसांनी केलेल्या डिजेमुक्त व गुलालविरहित मिरवणुकीला सर्वच मंडळांनी प्रतिसाद दिला. मिरवणुकीच्या काळात सर्वच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

उरुळी कांचन व परिसरातील सर्व लहान मोठ्या काढलेल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये लहान मुले, महिला व तरुणींनी मोठा सहभाग नोंदवला होता. येथील सर्व गणेश मंडळांनी ढोल ताशा सनई चोघडे, तुतारी, असे पारंपरिक वाद्यांच्या समवेत गणेश विसर्जन मिरवणूकिला सुरुवात झाली. काही गणेश मंडळांनी गुरुवारी (ता. १२) सकाळी दहा वाजल्यापासून विसर्जन मिरवणूकीची तयारी सुरू केली होती. तर सर्व गणपतींची रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले.

येथील महात्मा गांधी तरुण मंडळ, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, अनुपम मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, नव आझाद मित्र मंडळ, अखिल तळवाडी मित्र मंडळ, नवजीवन मित्र मंडळ, कोहिनूर मित्र मंडळ, भोलेनाथ मित्र मंडळ, श्रीमंत वीर तरुण मित्र मंडळ, साईनाथ मित्र मंडळ, नवचैतन्य मित्र मंडळ, अचानक मित्र मंडळ, अशा सर्व मंडळांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला.

महात्मा गांधी तरुण मंडळाने हिंद ढोल-ताशा तर महाराष्ट्र मंडळाने वणवा ढोल ताशा पथकाच्या साथीने गणेशमूर्तींचे विसर्जन केले. साईनाथ मित्र मंडळाच्या वतीने सोशल मिडिया शाप की वरदान या पथनाट्य सादर केले, व फ्लेक्सच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत सोशल मीडिया शाप आहे की वरदान याचे पथनाट्य सादर केले. या वेळी महिला व मुलींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.

भवरापुर (ता.हवेली) येथील मुळा मुठा नदी काठी परिसरात चिंतामणी मित्र मंडळातर्फे पहिल्या वर्षी मूर्ती दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ऐंशी गणपती दान म्हणून मिळाले.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like