‘या’ गावातील गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये चक्‍क ‘कव्वाली’ (व्हिडीओ)

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील त्या गावामध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी ‛कव्वाली’ लावल्या जातात हे वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल परंतु हे खरं आहे आणि हे गाव आहे दौंड तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास आलेले केडगाव.

केडगाव गावठाणामध्ये गेल्या पन्नास वर्षांपासून दरवर्षी नागेश्वर तरुण मंडळाच्या वतीने गेल्या पन्नास वर्षांपासून संपूर्ण गावाचा मानाचा गणपती बसवला जातो. विशेष म्हणजे या मंडळाच्या स्थापनेपासून या मंडळामध्ये सर्व जाती धर्माचे तरुण कार्यकर्ते काम करत आले असून या गणेशोत्सवामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य पहायला मिळत असते. शेवटच्या दिवशी संपूर्ण भक्ती भावाने पूजा अर्चा करून गणपतीची मिरवणूक काढली जाते आणि विविध मोहल्ले आणि वस्तींमधून ही मिरवणूक जात असताना भक्ती गीते, कव्वाली आणि मनोरंजनाची गाणी लावली जातात. मुस्लिम मोहल्ला येताच येथे सुमारे अर्धा तास ही मिरवणूक थांबवून तेथे कव्वाली लावली जाते आणि नंतर ही मिरवणूक पुढे सरकत जाते.

'या' गावातील गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये चक्‍क 'कव्वाली' (व्हिडीओ)

'या' गावातील गणपती विसर्जन मिरवणूकीमध्ये चक्‍क 'कव्वाली' (व्हिडीओ)

Geplaatst door Policenama op Vrijdag 13 september 2019

केडगाव गावातील मनाच्या या गणपतीचे संपूर्ण नियोजन हे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण देशमुख, सरपंच अजित शेलार पाटील, ज्ञानेश्वर जगताप, गिरीश कांबळे, अब्बास शेख, शाम गोरगल, प्रकाश देशमुख, अशपाक शेख, नागेश गोरगल, विठ्ठल शेंडगे, पिंटू उर्फ अशोक शेंडगे, अभिजित गायकवाड, नितीन गायकवाड, पोपट शेंडगे, रज्जाक इनामदार, रवींद्र पंडित, राहुल काळे, संतोष कुंभार, संदीप गोरगल, संतोष पंडित, हनुमंत जगताप, निलेश कुंभार, अजिंक्य गोसावी, सोहेल पठाण, संभाजी सूर्यवंशी, किशोर शर्मा, शाहरुख शेख, दिपक शर्मा, फारुख शेख, बापू कांबळे, शिवाजी गायकवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले होते.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like