पुण्यात मानाच्या गणपतीचं विसर्जन झालं ‘असं’ !

पोलिसनामा ऑनलाईन, पुणे, दि. 1 सप्टेंबर : आज अनंत चतुर्दशीनिमित्त आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला जातोय. पुण्यातही यंदा कोरोनामुळे कोणत्याही प्रकारे गर्दी न करता गणरायाला निरोप देण्यात आला आहे. यात विशेष म्हणजे, मानाच्या गणपतीचे विसर्जन होय. कोरोनामुळे अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून गणरायाला निरोप दिला आहे.

कसबा मानाचा पहिला गणपती, आज अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिलाय. मात्र, यंदाचा गणेशोत्सव कोरोना विषाणूच्या सावटाखाली पार पडला आहे.

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, दरवर्षी महाराष्ट्रात गणपती बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात, वाजत गाजत निरोप दिला जात होता. मात्र, यंदा वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाप्पाला अत्यंत साधेपणाने निरोप देण्यात आला.

गुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती, पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या वेळात अत्यंत साधेपणाने पारडले.

मानाचा चौथा तुळशीबाग मंडळासमोर तयार केलेल्या कृत्रिम हौदात यंदा अगदी शांततेत विसर्जन केले आहे.

मानाचा पाचवा केसरीवाडा, यंदा कसबा गणपतीसमोर कोरोना काळात महत्त्वपूर्ण योगदान देणारे पोलीस, डॉक्टर, नर्सेस आणि सफाई कर्मचार्‍यांना मानवंदना देणारी रांगोळी काढली होती.

भाऊ रंगारी पुण्यातील महत्त्वपूर्ण समजला जाणारा भाऊ रंगारी गणपतीचे विसर्जन दुपारी 2.45 वाजता पार पडले.

पहिला मानाचा कसबा गणपतीचे विसर्जन 11.30ला, दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे 12.30 ला, तिसरा मानाचा गुरुजी तालीम गणपतीचे 12.45 ला, चौथा मानाचा तुळशीबाग गणपतीचे 1.15 आणि पाचवा मानाचा केसरीवाडा गणपतीचे दुपारी 1.30 विसर्जन केले आहे.