‘या’ कारणांमुळं केलं जातं गणेश मूर्तीचं विसर्जन

पोलीसनामा ऑनलाईन टीम – संपूर्ण देवतांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. महाराष्ट्रातील अष्टविनायक हे जगभर प्रसिद्ध आहे. तसेच विघ्नहर्ता, लंबोदर, विनायक, सिद्धीवेदाय अश्या कितीतरी नावाने त्याला ओळखले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक शुभ कार्यात, पूजेत गणेशाला प्रथम स्थान मिळाले आहे. त्यात सर्वांचा लाडका बाप्पा आता काहीच दिवसात येत आहे. गणेशाच्या आगमनाची सर्वानाच उत्सुकता असते. १० दिवसांचा असणारा हा गणेशाेत्सव सर्वांच्याच अगदी जिव्हाळ्याचा असतो. परंतु त्यांच्या विसर्जनाच्या दिवशीही तितकीच नाराजी असते. आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन का केले जाते? हा प्रश्न सर्वानाच पडतो. गणपती जल तत्त्वाचे अधिपती आहे. हेच कारण आहे की अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चना करून गणपती-मूर्तीचे विसर्जन केले जाते.

धार्मिक ग्रंथानुसार महर्षी वेदव्यासजींनी गणपतीला सलग दहा दिवस महाभारताची गोष्ट ऐकवली होती. तर लागोपाठ दहा दिवस गणपतीने अक्षरश: ती कथा लिहिली होती. महाभारताची कथा सांगत असताना वेदव्‍यास यांनी आपले डोळे बंद ठेवले होते. त्यांच्या लक्षात आले नाही कि, या कथेचे गणपतीवर काय प्रभाव पडत आहे.

जेव्हा महर्षीने कथा पूर्ण करून डोळे उघडले तेव्हा त्यांनी बघितले की १० दिवसांपासून कथा ऐकल्याने गणपतीचा तापमान फार वाढले होते. त्यांना ताप आला होता. त्यामुळे महर्षी वेदव्यासांनी गणपतीला जवळच्या कुंडात डुबकी लावायला सांगितली ज्याने त्यांच्या शरीरातील तापमान थोडे कमी झाले.

असे मानले जाते की, गण‍पती गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापित राहतात, ज्याला आपण गणपती उत्सवाच्या दरम्यान स्थापित करतो. मान्‍यता अशी आहे की गणपती उत्सवाच्या दरम्यान लोक आपल्या सर्व इच्छा – आकांक्षा गणपतीच्या कानात सांगतात. गणेश स्थापनेनंतर १० दिवसांपर्यंत गणपती लोकांची इच्छा ऐकता ऐकता एवढे गरम होऊन जातात की चतुर्दशीला वाहत्या पाण्यात विसर्जित करून त्यांना शीतल करण्यात येते.

गणपती बाप्पाशी निगडित मोरया नावामागे गणपतीचे मयूरेश्वर स्वरूप मानले जाते. गणेश-पुराणानुसार सिंधू नावाच्या दानवाच्या अत्याचारापासून बचाव करण्यासाठी देवगणांनी गणपतीचे आव्हान केले. सिंधूचा संहार करण्यासाठी गणपतीने मयुराला वाहन म्हणून निवडले आणि सहा भुजांचा अवतार धारण केला. या अवताराची पूजा भक्त गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषासोबत करतात.

आरोग्यविषयक वृत्त –

 

You might also like