Pune : गणेश मूर्ती विक्रेत्यांना दरवर्षीप्रमाणे स्टॉल उभारण्याची परवानगी द्यावी : विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मूर्ती विक्रेत्यांना ङ्गिजिकल डिस्टंन्सिंगची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत दरवर्षीप्रमाणे रस्त्याच्याकडेला व पदपथांवर तात्पुरत्या स्वरुपात मूर्ती विक्रीची परवानगी देण्यात यावी. तसेच घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नेहमीप्रमाणे हौदही उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने डिस्टसिंग चे पालन करुन विविध व्यवसाय व दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. सध्या गणेश उत्सवाचे दिवस जवळ येत असुन पुणेकरांना गणेश मुर्ती उपलब्ध होण्यासाठी मूर्ती विक्रीचे स्टॅ|ल उभारणे, परवानगी देणे याबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेेचे आहे.

दरवर्षी पुणे शहरात गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. दरवर्षी पुणे महानगरपालिकेकडुन रस्त्यांच्या कडेला आणि पदपथांवर गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यासाठी नाममात्र भाडेदर आणि डिपॉझीट घेउन परवानगी देण्यात येते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मात्र रस्त्यांऐवजी मोकळी मैदाने आणि शाळांच्या आवारात परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे डिपॉझीट व भाडेदर वाढणार असुन याचा परिणाम मूर्तीच्या किंमती वाढण्यावर होणार आहे. मूर्तीकार आणि विक्रेत्यांसोबतच लाखो पुणेकरांचा विचार करून पुर्वीप्रमाणे अतिक्रमण विभागाच्यावतीने रस्त्याच्या कडेला स्टॉल उभारणीसाठी परवानगी द्यावी. इतर व्यवसायांप्रमाणेच या व्यावसायीकांनाही डिस्टंसिंग तसेच सॅनिटायजेशन बाबत आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी धुमाळ यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. यासोबतच मुर्ती या बाहेर विसर्जन करणेस येण्याची शक्यता असल्याने त्याबाबतचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. या संपुर्ण विषयाबाबत पुणेकरांमध्ये संभ्रमता असुन प्रशासनाची सदर विषयी असलेली स्पष्ट भुमीका तातडीने जाहीर करावी, असे पत्र महापौर यांना दिले आहे