पिंपरी-चिंचवड शहरात गणेश विसर्जन सोहळा दिमाखात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीस दुपार पासूनच सुरुवात झाली आहे. मात्र मोठ्या मंडळाचे काहीच गणपती मुख्य चौकातून गेले आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8737677-bf4e-11e8-9b83-d721003f8eb4′]

रात्री आठ प्रयत्न पिंपरी विसर्जन घाटाकडे ३० तर चिंचवड घाटाकडे दहा गणेश मंडळे मार्गस्थ झालेली आहे. मागील वर्षापेक्षा यंदा मंडळ आणि भक्ताचा उत्साह कमी जाणवत आहे. शहरातील सर्वच विसर्जन घाटांवर घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली.  ढोल ताशा, बँजोचा आवाज आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात सर्वजण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.

ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची आणि भंडाऱ्याची केली जाणारी मुक्त उधळण, झांज पथकाचे रंगलेले खेळ, तरुणाईचा शिगेला पोचलेला उत्साह अशा जल्लोषमय वातावरणात पिंपरी परिसरातील गणेश मंडळ बाप्पाला निरोप देत आहेत. गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक सजावट केली होती. दुपारी साडेबारा वाजता जी. के. एन. सटर्ड कंपनी मित्र मंडळाने मिरवणुकीत सर्वप्रथम सहभाग घेतला. रात्री आठ वाजेपर्यंत ३० मंडळांनी गणरायाला निरोप दिला. महानगरपालिकेतर्फे संत गाडगे महाराज चौक (कराची चौक) येथील स्वागतकक्षातून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात येत आहे.
[amazon_link asins=’B07FW8KSFP’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de952258-bf4e-11e8-bdae-cbb6d3d23aa1′]

विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन हौद बांधण्यात आले आहेत. नागरिक त्या हौदामध्ये गणेश विसर्जन करण्यास पसंती देत आहेत. पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल आणि महापालिका कर्मचारी सर्व घाट आणि विसर्जन मार्गांवर कार्यरत आहेत.
चिंचवड विसर्जन मार्गावर दुपारी दोन वाजता सुरुवात झालेली आहे. सर्व प्रथम चिंचवडगाव येथिल मोरया मित्र मंडळाचा गणपती मार्गस्थ झाला. त्यानंतर गणेश मित्र मंडळ, चिंचवडगाव, ओंकार मित्र मंडळ, बीएएमएस कॉलेज, सूर्योदय मित्र मंडळ, अजिंक्य मित्र मंडळ यासह १० मंडळाचे गणपती मार्गस्थ झाले आहेत. याच बरोबर शहरातील वाकड, रावेत, मोशी, सांगवी परिसरातही विसर्जन सोहळा सुरू आहे.

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन

You might also like