श्रींच्या विसर्जन मिरवणुकीत राजकीय शक्तिप्रदर्शन, राष्ट्रवादीच्या आमदारासह कार्यकर्त्यांना भगव्या पंचाचा मोह

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक रात्री बाराच्या ठेक्याला संपली. मात्र काही ठिकाणी ही मिरवणूक रेंगाळली होती. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी शक्तिप्रदर्शन करण्याचा मोह आवरला नाही.

नगरचा ग्रामदैवत श्री विशाल गणपती बरोबर सहा वाजता दिल्ली गेटच्या वेशी बाहेर पडला. विशाल गणपती शिवाय एकही गणपती मंडळाने यावर्षी कोणताही देखावा अथवा पारंपारिक वाद्य वाजवताना दिसून आले नाही. विशाल गणपतीसमोर नगर शहरातील तीन ढोल पथकांसह हलगी पथकाने एक वेगळाच रंग चढला होता. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र इतर गणपती मंडळांनी सीडी लावून त्याच्या तालावर नाचगाणे करत विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता.

यावर्षी आगामी विधानसभेचा थोडाफार रंग या मिरवणुकीवर जाणवला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी भगवा पंचा घालून मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता, तर हातात भगवा झेंडा घेऊन त्यांनी आगामी विधानसभेसाठी कोणता झेंडा हातात घ्यायचा, याचा संदेशही कार्यकर्त्यांना दिला. कारण राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भगवे पंचे घालून मिरवणुकीत सहभागी झालेले दिसत होते. तर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनीसुद्धा यावेळेस शक्तिप्रदर्शन करत मिरवणूक काढली. शिवसेनेचा नेहमीप्रमाणे शेवटचा गणपती बाराच्या ठेक्याला नेता सुभाष चौकात आल्यानंतर मिरवणूक बंद झाली. मिरवणुकीमधील गणपतीचे अंतर जास्त असल्याने अत्यंत रेंगाळलेल्या पद्धतीने ही मिरवणूक झाली. त्यामुळे आलेल्या भक्तांची मोठ्या प्रमाणात निराशा झाली होती.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like