Ganesh Jagtap | पुणे शहर पोलिस दलातील गणेश जगताप यांचा ‘इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटी’कडून ‘डॉक्टरेट’ पदवी देऊन ‘सन्मान’; अभिनेते सुमन यांचा देखील ‘गौरव’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शहर पोलिस दलात (Pune Police) गेल्या 30 वर्षापासुन कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष आणि धाडसी गणेश अशोक जगताप (Ganesh Jagtap) यांचा तामिळनाडूमधील कोयंबतूर येथील इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीकडून ( Indian Empire University) डॉक्टरेट पदवी (Doctorate Degree) देऊन सन्मान करण्यात आला आहे. कर्तव्याचे भान ठेवुन केलेल्या सामाजिक कार्याबद्दल हा सन्मान करण्यात आला आहे. इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीकडून युनिव्हर्सल डेव्हलपमेंट काऊंसिल तथा पीस ऑफि वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय वैश्विक शांतता प्रस्थापित करण्याच्या विषयावर एका अंतरराष्ट्रीय सेमीनारचे आयोजन करण्यात आले होते. त्या सेमीनारमध्ये गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना डॉक्टरेट डिग्री बहाल करण्यात आली. दरम्यान, याच कार्यक्रमामध्ये सुप्रसिध्द अभिनेता सुमन (Suman, Indian film actor) यांना देखील डॉक्टरेट बहाल करण्यात आले आहे.

Ganesh Jagtap | Ganesh Jagtap of Pune City Police was awarded Doctorate from 'Indian Empire University'; Actor Suman also present for seminar

सदरील सेमीनारला तामिळनाडूचे राज्यपाल (tamil nadu governor) देखील ऑनलाइन उपस्थित होते.
तामिळनाडू आणि कर्नाटकातील सुप्रसिध्द अभिनेते सुमन यांचा देखील यावेळी डॉक्टरेट देऊन सन्मान करण्यात आला.
सन 1992 साली पुणे शहर पोलिस दलात रूजू झालेल्या गणेश जगताप यांनी आतापर्यंत वेळावेळी सामाजिक कार्यात सहभागी राहून गोर-गरिबांची आणि दीन दुबळयांची मदत केली आहे.
त्यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणूनच की काय त्यांना आतापर्यंत अनेक राज्य स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

Ganesh Jagtap | Ganesh Jagtap of Pune City Police was awarded Doctorate from 'Indian Empire University'; Actor Suman also present for seminar

माजी राज्यपाल आणि सातार्‍याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, नागनाथ कोत्तापल्ले, द.मा. मिरासदार, भाई वैद्य, श्रीपाल सबनीस, डॉ. डी.वाय. पाटील, अभिनेत्री लिला गांधी यांच्यासह आदी मान्यवरांकडून गणेश जगताप यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.
पोलिस दलातील कर्तव्याबद्दल त्यांना आतापर्यंत 276 वेळा बक्षीसं मिळाली असून त्यांची 8 वेळा राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करण्यात आली आहे.
पोलिस महासंचालकांकडून दिलं जाणारं सन्मान चिन्ह म्हणजेच डीजी मेडल देखील गणेश जगताप (Ganesh Jagtap) यांना यापुर्वी मिळालेलं आहे.

Ganesh Jagtap | Ganesh Jagtap of Pune City Police was awarded Doctorate from 'Indian Empire University'; Actor Suman also present for seminar

तामिळनाडूच्या राज्यपालांच्या ऑनलाइन उपस्थितीत आणि सुप्रसिध्द अभिनेता सुमन यांच्यासह डॉक्टरेट देऊन सन्मान झाल्यामुळं गणेश जगताप यांचं सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
इंडियन एम्पायर युनिव्हर्सिटीनं डॉक्टरेट देऊन गौरव केल्याबद्दल गणेश जगताप (Ganesh Jagtap)यांनी युनिव्हर्सिटीचे आभार व्यक्त केले आहेत.

Ganesh Jagtap | Ganesh Jagtap of Pune City Police was awarded Doctorate from 'Indian Empire University'; Actor Suman also present for seminar

Ganesh Jagtap | Ganesh Jagtap of Pune City Police was awarded Doctorate from 'Indian Empire University'; Actor Suman also present for seminar

Ganesh Jagtap | Ganesh Jagtap of Pune City Police was awarded Doctorate from 'Indian Empire University'; Actor Suman also present for seminar

Web Title : Ganesh Jagtap | Ganesh Jagtap of Pune City Police was awarded Doctorate from ‘Indian Empire University’; Actor Suman also present for seminar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात ! सुदैवाने जीवित हानी नाही, वाहनांच्या लांबच लांब रांगा (व्हिडीओ)

Coronavirus in India | देशात कोरोना’ची 8865 नवी प्रकरणे आली समोर, 287 दिवसात आतापर्यंतचा सर्वात कमी आकडा

Anti Corruption Bureau Thane | लाच घेण्यासाठी ‘तो’ कार्यालयात रात्री साडेआठ वाजेपर्यंत थांबला; जात पडताळणी समितीचा सचिव ACB च्या जाळयात