पुणे पोलीस दलातील गणेश जगताप यांचा ‘राष्ट्रीय गोमंतक’ पुरस्कारानं सन्मान !

पणजी : वृत्तसंस्था – पुणे पोलीस दलातील गणेश जगताप यांना गोमंतक गोवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. गोव्यातील मडगाव येथे काल (रविवार, दि. 22 डिसेंबर 2019) तृतीय राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्रीपाद नाईक संरक्षण राज्यमंत्री आणि आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार, भारत सरकार) यांच्या शुभहस्ते गणेश जगताप यांना गोमंतक गोवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Ganesh Jagtap

हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था ओगलेवाडी, कराड यांच्या वतीनं तृतीय राष्ट्रीय गोमंतक गोवा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावर्षी पुरस्कार प्राप्त झालेल्यांमध्ये पुणे पोलीस दलातील गणेश जगताप यांचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वीच त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. गोव्यातील मडगाव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सकाळी 10.30 वाजता हा सोहळा पार पडला. आपल्या सामाजिक कार्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा सन्मान गोव्यात सन्मान झाला आहे.

गणेश जगताप यांच्याविषयी…
गणेश जगताप यांना पुणे पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस महासंचालक पदक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासह पुणे भुषण पुरस्कार विजेते, पुणेरत्न वर्दितील माणुसकी पुरस्कार, राजस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार, सामाजिक सुरक्षा गौरव पुरस्कार, लोकमंगल गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, पोलिस मित्र संघटना राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श सेवा पुरस्कार, पुणे भुषण प्रेरणा, कला उपासक, अक्कलकोट भुषण पुरस्कार यांसारखे असंख्य सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना पोलीस दलात 28 वर्षे झाली आहेत.

गणेश जगताप यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आतापर्यंत त्यांना २६५ रिवार्ड मिळाले आहेत. गणेश जगताप यांची उत्कृष्ट कामगिरी व उत्कृष्ट कामाचा आलेख पाहून त्यांची ५ वेळा राष्ट्रपती पदक पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Rashtriy Gomantak Purskar

संस्थेविषयी थोडक्यात…
हुतात्मा बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेची स्थापना ऑक्टोबर 2002मध्ये करण्यात आली आहे. गेल्या 17 वर्षांपासून ही संस्था अपंग आणि गोर-गरिबांसाठी पूर्ण भारतभर काम करत आहे.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/