गणेश जगताप यांना ‘सेवारत्न’ पुरस्कार प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पोलिस दलातील गणेश जगताप यांना हुतात्मा अपंग बहुद्देशिय विकास कल्याणकारी संस्था (कराड) यांच्यावतीने सेवारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. सहाव्या राज्यस्तरीय अक्कलकोट भूषण पुरस्कारादरम्यान हा पुरस्कार गणेश जगताप यांना प्रदान करण्यात आला.

यापूर्वी पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गणेश जगताप यांना पोलिस महासंचालक पदक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासह पुणे भुषण पुरस्कार विजेते, पुणेरत्न वर्दितील माणुसकी पुरस्कार, राजस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार, सामाजिक सुरक्षा गौरव पुरस्कार, लोकमंगल गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, पोलिस मित्र संघटना राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श सेवा पुरस्कार, पुणे भुषण प्रेरणा, कला उपासक, अक्कलकोट भुषण पुरस्कार यासारखे असंख्य सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत.

गणेश जगताप यांनी आतापर्यंतच्या सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना २६५ रिवार्ड मिळाले आहेत. तर बेपत्ता ९२ अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यास मदत केली. तर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असताना त्यांनी बळजबरीने वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या राज्यातील आणि विदेशातील एकूण ३२४ मुलींची सुटका करण्यास मदत केली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like