अनावश्यक खर्च टाळून गणेश मंडळांनी केरळ पूरग्रस्तांना मदत करावी 

श्रीकृष्ण-क्रांती मित्र मंडळास प्रथम क्रमांक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

गणेश मंडळे जनजागृतीपर संदेश देणाऱ्या देखाव्यांतून सामाजिक भावना जपतात तसेच अनेक मंडळे गरजू व्यक्तींना मदत तसेच आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण यासारख्या सामाजिक कामात मनापासून सहभागी होतात. सामाजिक भान जपून मंडळानी अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम केरळ पूरग्रस्तांसाठी द्यावी असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.
गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला पाहिजे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्यावतीने पिंपरी-चिंचवड राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेविका शारदा सोनवणे, भाजपचे प्रवक्ते अमोल थोरात आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07DN39H94,B07FM7ZD35′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’082e28cd-a782-11e8-b682-63b515d7a7d0′]
गिरीश बापट म्हणाले, श्री गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या वेळी काही उत्साही कार्यकर्ते असतात. मद्यपान करुन काहींचा धिंगाणा सुरु असतो. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागते. याचे भान प्रत्येक कार्यकर्त्यांना हवे. त्यामुळे दारु प्याल तर पोलीस कोठडीत जाल. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पण या उत्सवाचा खरा हेतु साध्य होताना दिसत नाही”
धार्मिक सण साजरे करताना प्रत्येकाने अन्य धर्माचा अनादर होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असून उत्सवांमध्ये सुरक्षितता ही महत्त्वाची आहे.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ” मंडळांनी समाजप्रबोधनात्मक देखावे करण्याची गरज आहे. 2017 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 126 सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला. त्यातील 96 मंडळे बक्षिसांसाठी पात्र ठरली आहेत. ट्रस्टतर्फे 11 लाख 66 हजार रुपयांची बक्षिसे यंदा प्रदान करण्यात येणार आहेत”. आमदार महेश लांडगे यांनी केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीला गणपती मंडळांनी पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत करावी असे आवाहन केले.

आकुर्डी गावठाणातील श्रीकृष्ण-क्रांती मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला. भोसरीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाला द्वितीय तर चिंचवडच्या एस. के. एफ. गणेशोत्सव मंडळाला तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत चौथा व पाचवा क्रमांक निगडीच्या जय बजरंग तरूण मंडळ व खंडोबा मित्र मंडळाने मिळविला. ही स्पर्धा प्रभागनिहाय घेण्यात आली. दत्तात्रय भोंडवे, दिलीप माळी, श्रीकांत ताकवले, संतोष ढोरे, प्रफुल्ल तोरसे, संभाजी सूर्यवंशी, संजय कुंभार, रामदास चिंचवडे व वैभव गोडसे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.