Ganesh Naik | भाजप आमदारावर महिलेचे लैंगिक अत्याचाराचे आरोप; राज्य महिला आयोगाने घेतली दखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ganesh Naik | माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 1993 पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचं आमिष देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचं गंभीर आणि धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. याबाबत राज्य महिला आयोगाने (Maharashtra State Commission for Women) माहिती दिली आहे.

 

नवी मुंबई येथील एका महिलेने ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगास प्राप्त झालेला आहे त्यामध्ये पीडित महिलेने अशी तक्रार केली आहे की ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्यासोबत पीडित 1993 पासून लिव्ह – इन – रिलेशनशिपमध्ये (Live – in – relationship) राहत आहेत.
सदर संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा आहे. या महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी या महिलेस व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत आहेत
आणि त्यांच्या मुलाच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याचं पीडितेने महिला आयोगाला केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

या महिलेने दाखल केलेली तक्रार गंभीर स्वरूपाची असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली असून
यावर योग्य कारवाई तात्काळ करून त्याचा अहवाल 48 तासांच्या आत सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.
गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईकसुद्धा पीडित महिलेला संबंध संपवून कोणालाही माहिती न देता निघून जाण्यासाठी मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

नेरूळ पोलीस स्थानकात (Nerul police station) याबाबत लेखी तक्रार देवूनही पोलिसांकडून कार्यवाही होत नाही.
यामुळे गणेश नाईक यांचे विरुध्द भारतीय दंड विधान IPC 376, 420, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद करावा
आणि त्यांना पोलीस संरक्षण (Police protection) उपलब्ध करून द्यावे असा विनंती अर्ज त्यांनी राज्य महिला आयोगाला केला आहे.

 

दरम्यान, गणेश नाईक यांनी आपली राजकीय कारकीर्दीची सुरूवात शिवसेनेमधून केली होती.
त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

 

Web Title :- Ganesh Naik | BJP MLA accused of sexually abusing a woman Maharashtra State Commission for Women

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा