गणेश नाईकांच्या कुटुंबात उभी फूट ? संजीव नाईक सोडणार नाहीत ‘राष्ट्रवादी’ !

नवी मुंबई : पोलिसनमा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या गणेश नाईक यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या आधी गणेश नाईक यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यावेळी गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. मात्र ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी ते देखील एकटेच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांच्याबरोबर त्यांचा मोठा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार संजीव नाईक राष्ट्रवादीतच राहण्याची शक्यता आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात फूट पडू शकते. सध्या संवाद यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याबरोबर असलेल्या संजीव नाईक यांनी विविध कार्यक्रमात सहभाग देखील नोंदविला आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादी सोडणार नसल्याच्या चर्चा रंगत आहेत.

गणेश नाईक पाडणार राष्ट्रवादीला खिंडार
गणेश नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचे नक्की केले असून लवकरच ते प्रवेश करणार आहेत. मात्र ते जिल्ह्यातील अनेक नेते, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्यांसह प्रवेश करणार असल्याने यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. त्यामुळे आता ते किती जणांसह भाजप प्रवेश करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –