भाजप प्रवेशाच्या चर्चा चालू असतानाच राष्ट्रवादीच्या गणेश नाईक यांचा युतीला ‘दणका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे गणेश नाईक राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली असताना दुसरीकडे गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील युतीच्या स्थानिक नेत्यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या निवडणूकीत नाईक यांनी युतीला चांगलाच झटका दिला आहे. नाईक गटाने युतीला पराभवाची धूळ चारत युतीचा फडशा पाडला. नाईक यांनी युतीच्या नमो पॅनलचा पराभव केला असून नाईक यांच्या डॉ. राणे पॅनलचा 11 विरुद्ध 1 अशा फरकाने विजय झाला.

गणेश नाईक यांचा तेथील स्थानिक युतीच्या नेत्यांशी अनेक वर्षापासून राजकीय संघर्ष आहे. परंतू येऊ घातलेल्या विधानसभेला नाईक भाजपात प्रवेश करणार अशी शक्यता आहे.

काही दिवसापूर्वी गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. आता गणेश नाईक देखील भाजपच्या वाटेवर आहेत. सध्या चर्चा आहे की, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य यांच्यासह नाईक भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

परंतू गणेश नाईक यांना युतीच्या स्थानिक नेत्यांचा असलेला विरोध आणि त्यांच्यातील राजकीय वाद यामुळे भाजप प्रवेशानंतर विधानसभेला काय होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे 57 नगरसेवक भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली होती. जर एवढ्या नगरसेवकांनी एकदम राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यास पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त-