घरच्या घरीच बनवा ‘पालक-मटार मोदक’, जाणून घ्या रेसिपी

गणेशोत्सवात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. अनेकांना मोदक खायला खूप आवडतं. उत्सवा व्यतिरीक्त तुम्ही इतर दिवशीही मोदक बनवू शकता. तुम्ही आजवर गोड मोदक खाल्ले असतील. परंतु कधी तिखट मोदक करता आले तर, तेही हेल्दी भाज्यांचा वापर करून. आज याच प्रकारचे मोदक कसे बनवता येतील याची माहिती घेणार आहोत. यासाठी आपण पालक-मटार मोदक बनवण्यासाठी रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य –

– दीड कप मैदा
– दोन चमचे तेल
– अर्धा कप पालक पेस्ट
– मीठ चवीनुसार

सारणासाठी लागाणारं साहित्य –

– एक कप वाटाणे (उकडून वाटलेले)
– एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा.
– कोथिंबीर
– एक चमचा लिंबाचा रस
– एक चमचा साखर
– मीठ, हळद
– तिखट मिरची
– जिरं पेस्ट

कृती –

– पालक उकडून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
– मैदा, तेल, मीठ, पालक पेस्ट एकत्र करून घट्ट पीठ मळा
– कढईत तेल गरम करून त्यात वाटाणा, बटाटा आणि वरील मसाला घालून एकत्र करा.
– पालकाच्या कणकेचा लहान गोळा करून हातावरच जरा खोलगट करा.
– त्यात सारण भरून मोदकाप्रमाणे आकार देऊन तळून घ्या.