यंदा ना ढोलताशांचा गजर, ना DJ चा आवाज, बाप्पाला साधेपणाने निरोप !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पुणेरी कार्यकर्ते आणि ढोल-ताशांचे समीकरण पक्के आहे. गणपती उत्सवासह विसर्जन मिरवूणकीत याची चुणूक दिसून येत होती. यंदा मात्र, कोरोनामुळे बाप्पाचे विसर्जन अगदी साध्यापदधतीने करण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.

दरवर्षी वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोना साथीचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळं सोशल डिस्टनसिंग आणि शांततेत बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. दिमाखदार विसर्जन मिरवणूक सोहळा यंदा पार पडणार नसला तरी विसर्जनाच्या दिवशी ठेवण्यात येणारा बंदोबस्त कायम ठेवण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीला मुंबई आणि पुण्यातील माहौल कसा असतो. पण यावर्षी मुंबईचा राजा, लालबागचा राजा किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे निर्णय घेतला आहे. तर पुण्यातील गणेशोत्सवाची ख्यातीही देशभरात आहे, कोरोना संकटात इथेही साधेपणा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मानाच्या गणपतीचं मंडपातच विसर्जन होणार आहे. मिरवणुकीच्या आदल्या दिवशी सायंकाळनंतर मंडळांचे कार्यकर्ते ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मिरवणूक मार्गावर यायचे. त्यानंतर रांगा लावणारे कार्यकर्ते आणि पोलीस मिरवणूक मार्गावर असायचे. यंदा हे दृश्य पाहायला मिळले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना चुकचुकल्यासारखे वाटत आहे.