Ganeshotsav 2022 | आफ्रिकेत ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष, असा वाजवला नगारा; व्हिडिओ करेल आश्चर्यचकित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ganeshotsav 2022 | गणेश चतुर्थीचा सण गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिर, मंडपासह घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेश चतुर्थी फक्त भारतातच साजरी केली जाते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर पहा. (Ganeshotsav 2022)

 

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे… ज्यात आफ्रिकेतील लोक आपल्या पद्धतीने गणपती बाप्पा मोरया म्हणत आहेत. त्यांच्यातील उर्जा पाहून तेच बाप्पाचे खरे भक्त असल्याचे जाणवते. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहिल्यावर वाटते की गणपती बाप्पाचा सार्वजनिक मंडप उभारण्यात आला आहे आणि बाप्पाचे भक्त तिथे नाचत आहेत आणि गात आहेत. या व्हिडीओची सर्वात खास गोष्ट म्हणजे आफ्रिकेतील हे लोक त्यांच्याच कपड्यात बाप्पाचे स्वागत करत आहेत. (Ganeshotsav 2022)

 

 

@IndiaTales7 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की आफ्रिकेत गणेश चतुर्थीचा शुभ उत्सव !! वृत्त लिहीपर्यंत सहा लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, लोक कमेंट करून प्रतिक्रिया देत आहेत.

 

 

एका यूजरने लिहिले आहे की, आफ्रिकेतही गणेश चतुर्थी उत्साहात साजरी होत आहे हे पाहून आनंद झाला. तर दुसर्‍या यूजरने लिहिले, ’ओम श्री गणेशाय नमः’ आणखी एका यूजरने व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, या व्हायरल व्हिडिओने माझा दिवस बनवला आहे. याशिवाय अनेकांनी हा व्हिडिओ शेअर देखील केला आहे.

 

 

 

Web Title :- Ganeshotsav 2022 | ganesh chaturthi celebrations in africa adoralable clip goes viral on social media

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pradhan Mantri Awas Yojana | प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत PMRDA ने 1604 सदनिकांसाठी मागविले ऑनलाईन अर्ज

 

Pune Crime | शारीरीक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने 32 वर्षीय तरुणीची आत्महत्या; विश्रांतवाडी परिसरातील घटना

 

Deepak Kesarkar | आपले आमदार सांभाळा नाहीतर.., दीपक केसरकरांनी दिला सूचक इशारा