नियमावलीवरून आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का नाही?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचे संकट लक्षात घेत ठाकरे सरकारने (Thackeray government ) मंगळवारी (दि. 29) गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा 5 फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही 2 फुटांची असावी अशी मर्यादा सरकारने घालून दिली आहे. या नियमावलीवरुन (Ganeshotsav rules) भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government ) घणाघाती टीका केली आहे. ठाकरे सरकारचं काय चालंलय हेच कळत नाही. हे सरकार बिनडोकपणे वागत आहे. गणेशोत्सव अऩ् कोरोना अटकाव याचा संबंध नाही. राज्य सरकारला डिस्को पब चालतात मग गणेशोत्सव का चालत नाही, असा सवाल शेलार यांनी केला आहे. ganeshotsav bjp mla ashish shelar criticizes mahavikas aghadi government over ganeshotsav rules

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुण्यात 10 वी, 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी; 5 जुलै रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा, या पदासाठी होणार भरती

आमदार आशिष शेलार म्हणाले की, गणेशोत्सवाबाबत सरकारने एक एक नियम असे घातले आहेत की आता घरातल्या धातूच्या मूर्तीच पूजन करावे लागणार आहे.
राज्य सरकारला डिस्को पब चालतात आणि गणेशोत्सव चालत नाहीत.
गणेशमूर्ती बनवायला 3 महिने आधीपासून सुरुवात केली जाते.
आता राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मूर्तीकारांचे मोठे नुकसान होणार आहे.
त्यांना एक रुपयाचीही मदत सरकारने दिली नाही.
ठाकरे सरकार बिनडोकपणे वागत आहे. त्याचा आपण निषेध करतो, असा हल्लाबोल शेलार यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

Web Titel : ganeshotsav bjp mla ashish shelar criticizes mahavikas aghadi government over ganeshotsav rules

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मोठा दिलासा ! पुणे, कोल्हापूर, सांगली आणि मिरज रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटासाठी आता 50 ऐवजी 10 रुपये फक्त, जाणून घ्या

Pimpri-Chinchwad News | पिंपरी-चिंचवड शहरात आता ‘या’ 13 मुख्य रस्त्यावरील आणि उड्डाणपुलाखालील ठिकाणी पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार, 1 जुलैपासून अंमलबजावणी

Maratha Reservation । तर.. मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

Pune Crime News | सायबर भामट्यांची फास्ट टॅगवर वक्रदृष्टी, करताहेत ‘हा’ उद्योग