चौदाशे पोलीस आणि अठराशे ४५ मंडळे ‘गणेशोत्सव बंदोबस्त’ पोलिसांवर मोठा ताण

गणेशोत्सव शांतता बैठक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिलाच गणेशोत्सव होत आहे. आयुक्तालयाची अद्याप घडी बसलेली नसून मनुष्यबळ कमी आहे. १८४५ अधिकृत मंडळे असताना फक्त १४०० पोलीस बंदोबस्ताला असणार आहेत. त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन सर्वांनीच आज बैठकीत केले.
[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7861d777-b2b6-11e8-b046-b1b91ae810c1′]

आज झालेल्या या बैठकीस पालकमंत्री गिरीष बापट, महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे, शिवाजीराव आढळराव-पाटील, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, सुरेश गोरे, बाळा भेगडे हे सर्व अनुपस्थित होते.
रस्ते खड्डे मुक्त, परवानग्यासाठी एक खिडकी योजना, पालिकेकडून योग्य उपाय योजना कराव्यात, मंडप शुल्क कमी करावे, विसर्जन मिरवणुकीत साउंडचे बंधन नसावे, मंडप शुल्क माफ करावे, योग्य पोलीस बंदोबस्त असावा, गर्दीत छेडछाड होणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, मिरवणूक मार्गात जादा पोलीस बंदोबस्त ठेवावा, शहरातील तोडफोड सत्र बंद करावे, गणेश मुर्त्या बनवणाऱ्या कारागिरांना पर्यावरणपूरक मूर्ती बनवायला सांगाव्यात, शहरातील रस्ते गणपती येण्यापूर्वी डांबरीकरण होणे गरजेचे, शहरात स्वच्छता ठेवावी यासारखे अनेक प्रश्नांचा भडीमार गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज पर्यावरणपूरक गणेशोत्सव-शांतता बैठक पार पडली. पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर सचिन चिंचवडे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक तुषार कामठे, विलास मडिगेरी, कुंदन गायकवाड, वसंत बोराडे, नामदेव ढाके, मोरेस्वर शेडगे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7e29073e-b2b6-11e8-b3e6-89c751053eac’]

आयुक्त हार्डीकर म्हणाले, शहरात पाणी पूरवठा, गटारीची कामे सुरू असल्याने खड्डे पडलेले आहेत. मात्र विसर्जन मिरवणुकीपूर्वी सर्व रस्त्यावरील खड्डे बुजवून, डांबरीकरण करण्यात येईल. विसर्जन घाटाची डागडुजी सुरु आहे. मंडळांनी जे घाट विसर्जनास योग्य आहेत त्याच घाटावर विसर्जन करावे. जे वापरण्यास मनाई आहे त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात येणार आहेत. मंडप उभा करताना परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. मंडळाने उत्सव साजरा करताना उच्च न्यायालयाचे आदेश पाळावेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करायचा आहे. सामाजिक परिवर्तन घडवणारे देखावे सादर करावेत. ‘स्वाईन फ्लू’ लागण वाढत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू सदृश्य भक्तांनी गर्दीत जाऊ नये. ढोल ताशा पथकातील ‘टोल’वर नियंत्रण आणावे, असेही आवाहन हार्डीकर यांनी केले.

सध्या पेट्रोल डिझेल महाग झाले असल्याची चर्चा आहे, मात्र पोटात जाणारे डिझेल-पेट्रोल कितीही पोटात गेले तरी कोणीही बोलत नाही. गणेशोत्सव काळात पोटात जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलवर नियंत्रण ठेवा, उत्सव निर्विघन पार पडेल. नागिरकांनी आणि मंडळाच्या कार्यकर्त्यानी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी केले. गणेश मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करू असे उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी आश्वासन दिले.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात