बनावट कागदपत्राद्वारे बँकांना गंडा घालणारी टोळी जाळ्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

बनावट कागदपत्रे, दस्तऐवज बँकेत सादर करून कर्ज घेत, त्यांची परतफेड न करता बँकेला गंडा घालणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा शनिवारी पोलिसांनी पदार्फाश केला. रोमी कपूर उर्फ कौशिककुमार कौस्तुभ नाथ (वय ४१), साकेत दीक्षित (वय ३४), विशाल तिवारी (वय ४१), जिग्नेश रजनी (वय ३१) आणि विकास डोंगरे (वय ३४) अशी त्यांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6a1b5f12-c470-11e8-adf0-399872517fd0′]

मांडवी बँकेकडून वाहन कर्ज घेण्यासाठी रजनी आणि डोंगरे यांनी त्यांच्या बंद असलेल्या एस. एस. मोटर्स कंपनीची बनावट कागदपत्रे नाथ याला बनवून दिली. नाथने ठाण्यात गाळा घेतल्याचे दाखवत मांडवी बँकेतून ५९ लाख आणि बँक आॅफ इंडियामधून ७ लाख रुपयांचे खासगी कर्ज काढले. तर इंडियन बँकेतून तिवारी आणि दीक्षित यांनी अनुक्रमे २९ आणि २१ लाखांचे वाहनकर्ज काढले. मात्र त्या कर्जाची परतफेडच केली नाही.

सेवाग्राम आश्रमात काँग्रेसला बैठकीसाठी परवानगी नाकारली

रोमी कपूर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून बॅँकेत एंजट म्हणून काम करणारा तिवारी त्याला माहिती पुरवत होता, या टोळीकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अटक केलेल्यांपैकी तिवारी हा बँकेचा दलाल आहे. तो कर्ज काढून देण्याचे काम करतो, तर उर्वरित तिघांनी बनावट कागदपत्रे नाथला देऊन बँकेकडून गृहकर्ज, वाहन कर्ज, खासगी कर्ज काढत पैसे उकळले. गेल्या सप्टेंबर महिन्यापासून हे पाच जण बँकांना चुना लावत होते. ही माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष-११ चे प्रभारी चिमाजी आढाव यांना मिळाली. या प्रकाराची दखल घेत रोमी कपूर हे बनावट नाव धारण केलेल्या नाथला आढाव यांच्या पथकाने प्रथम ताब्यात घेतले. नाथच्या झडतीत पोलिसांना प्रत्येकी दोन पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना आणि अन्य कागदपत्रे सापडली. या सर्वांवर एकाच व्यक्तीचा फोटो लावून राजन कपूर आणि कौशिक नाथ या दोन नावांनी ती तयार करण्यात आली होती. यासाठी त्याने बँक दलाल तिवारी याची मदत घेतल्याचे उघड झाले. ओशिवरा पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. तिवारी आणि नाथकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. या टोळीने जे कर्ज विविध बँकेतून काढले ते आपापसात वाटून घेतल्याची कबुली पोलिसांना दिली.

[amazon_link asins=’B073C2F6PX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9392c1fe-c470-11e8-a1ce-cda9fb9607bc’]

नाथ हा उच्चशिक्षित असून त्याच्यावर कोलकातामध्ये देखील अशाच प्रकारे कोटींची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. तिवारी वगळता सर्व पदवीधर असून त्यांची पार्श्वभूमी पोलीस तपासत आहेत. झटपट पैसा कमवून उच्चभ्रू आयुष्य जगण्याच्या लालसेपोटी त्यांनी हा गुन्हा केल्याचे उघड झाले. या टोळीने आणखी काही बँकांची अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात